Dada Bhuse News : पाऊस नसल्याने काटकसर करावी; दादा भुसेंचे आवाहन

Dada Bhuse Latest Marathi News
Dada Bhuse Latest Marathi Newsesakal

Dhule News : जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ७५ टक्के पाऊस झाला आहे. पावसाचा आणखी दीड महिना कालावधी शिल्लक आहे.

त्यामुळे पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन दादा भुसे यांनी केले. (Dada Bhuse appeal to use water less dhule news )

शिल्लक कालावधीत चांगला पाऊस झाल्यास जिल्ह्यातील लहान-मोठे प्रकल्प भरल्यास टंचाई दूर होईल. यंदाच्या खरीप हंगामात तीन लाख ७५ हजार हेक्टर क्षेत्रात विविध पिकांचा पेरा झाला आहे.

प्रत्येक नागरिकाने पाण्याचे महत्त्व ओळखून पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांनी स्वातंत्र्यदिनी झालेल्या कार्यक्रमावेळी केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dada Bhuse Latest Marathi News
Dhule Agriculture News : क्रांतिकारकांच्या गावाचा मुळा खातोय भाव; सुरत, शहादा बाजारात लिलावास प्रथम प्राधान्य

ते म्हणाले, की महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत आरोग्य संरक्षणात प्रतिकुटुंब प्रतिवर्ष पाच लाखांची तरतूद केली असून, राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक कुटुंबे व अधिवास प्रमाणपत्रधारक कुटुंबांना पाच लाखांपर्यंतचा उपचाराचा लाभ मिळणार आहे.

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून आता दर वर्षी सहा हजार रुपयांचा लाभ पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे.

Dada Bhuse Latest Marathi News
Nashik Dada Bhuse : ‘क्वालिटी सिटी’ चळवळीत सहभागी व्हा : पालकमंत्री भुसे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com