Datta Jayanti 2023 : धुळ्यात आजपासून दत्त जयंती सप्ताह; मंदिरात विविध कार्यक्रम

Shri Datta Murti
Shri Datta Murtiesakal

Datta Jayanti 2023 : शहरातील खोल गल्लीतील प्राचीन श्री गणपुले दत्त मंदिरात यंदा १८३ व्या श्री दत्त जयंती उत्सवास बुधवारी (ता. २०) सुरवात होत आहे. मंगळवार (ता. २६)पर्यंतच्या सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रम होतील, अशी माहिती विश्वस्त मंडळाने दिली.

सप्ताहात रोज सकाळी नऊला श्री दत्त गुरूंच्या चरणी लघुरुद्र अभिषेकरोज, रात्री नऊला श्री सिद्धेश्वर भजनी मंडळाचा कार्यक्रम होईल. (Datta Jayanti week in Dhule from today dhule news)

बुधवारी दुपारी तीनला शारदा महिला भजनी मंडळ, गुरुवारी दुपारी तीनला भिडेबाग महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम होईल. शुक्रवारी सायंकाळी पाचला संतीताचार्य प्रा. डॉ. शेखर रुद्र यांचा गायनाचा कार्यक्रम होईल. शनिवारी सकाळी वेदपाठ शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात येईल. दुपारी तीनला रेणुका भजनी मंडळाचा कार्यक्रम होईल.

श्री गोंदवलेकर महाराज भक्त परिवारातर्फे रविवारी सकाळी सामूहिक उपासना होईल, तर दुपारी तीनला आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातर्फे भजन सेवा होईल. सोमवारी दुपारी तीनला चैतालीताई जोशी यांचे कीर्तन होणार आहे.

Shri Datta Murti
Datta Jayanti 2022: दत्त जयंतीला मनोभावे दत्ताची आराधना करून, सुख-समृद्धी 'हे' उपाय करा..

मंगळवारी दुपारी चारला ज्येष्ठ भागवत कथाकार व ललितादेवी संस्थानचे धनंजयानंदजी देशपांडे यांचे दत्त जयंतीनिमित्त कीर्तन होईल. सायंकाळी सहाला मंदिरात श्री दत्त जन्मोत्सव साजरा होईल. बुधवारी (ता. २७) सकाळी काल्याचे भजन झाल्यावर मंदिरात दुपारी बाराला महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.

सप्ताहातील विविध धार्मिक कार्यक्रमांना भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री गणपुले दत्त मंदिर संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष शरदचंद्र देशपांडे, कार्याध्यक्ष धनश्री गरुड, उपाध्यक्ष अनुप बनछोड, कोषाध्यक्ष सागर देशपांडे, ज्येष्ठ विश्वस्त आनंद कुलकर्णी, अभय शेंद्रे, अॅड. गिरीश ओढेकर, शिवकुमार डोंगरे, व्यवस्थापक माधव बापट यांनी केले.

Shri Datta Murti
Datta Jayanti 2023 : घरात पाण्याच्या झऱ्यात सापडली सोन्याची दत्तमूर्ती, वजन शुन्य असूनही सहज उचलणे अशक्यच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com