जळगाव- औद्योगिक विकासाच्या दृष्टीने जळगावात आयटी पार्क स्थापन करण्याची मागणी करीत स्टार्टअप हब निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव ‘सकाळ- यिन’ आयोजित जिल्हास्तरीय अधिवेशनातून करण्यात आला. यासह विविध विषयांबाबतचे ठराव शासनाला सादर करण्यात येणार असल्याचेही या वेळी ठरले.