भीतीपोटी राईनपाड्यात आता उरले केवळ वृद्ध

विनायक पाटील
मंगळवार, 3 जुलै 2018

आमळी - भिक्षेकरींच्या कालच्या हत्याकांडानंतर राईनपाडा (ता. साक्री) येथे कमांडो पथकासह पोलिसांचा जादा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

काहींनी जंगलाचा आश्रय घेतल्याने बहुतेक घरांना कुलूप तर काही घरात केवळ वृद्ध पुरुष महिला असल्याने गावभर जणू अघोषित संचारबंदीचे वातावरण आहे. बकऱ्या, कोंबड्यांव्यतिरिक्त गल्लीत चिटपाखरूही दिसून येत नाही. 

मुले पळविणाऱ्या टोळीच्या संशयावरून काल पाच जणांना बेदम मारहाण करीत त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेने सारे समाजमन हादरून गेले आहे. मारहाण होत असताना आम्ही तसे नाही आहोत असे पाचही जण हात जोडून विनवणी करीत असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. मात्र संबंधित दारूच्या नशेत असल्याने कुणीही मदतीसाठी पुढे सरसावले नाहीत. उलट काहींनी प्रोत्साहनच दिले. त्यामुळे प्रक्षुब्ध जमावाकडून एवढे मोठे टोकाचे पाऊल उचलले गेले.

सध्या राईनपाड्यात मोठा पोलिस फौजफाटा आहे. परिसरातील नागरिकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय. मात्र ऐन पेरणीच्याच कालावधीत घटना घडल्याने गावात शांतता पसरली आहे. आज तर महिलाही मुलांसह बाहेरगावी निघून गेल्या, केवळ वृद्ध आहेत, तेही दरवाजा बंद करून बसले आहेत.

Web Title: dhule aamli rainpada hatyakand rainpada condition crime police