Dhule Bribe Crime : लाचखोर वाहनचालक अन् पंटरविरुद्ध ‘लाचलुचपत प्रतिबंधक’कडून कारवाई

Dhule Bribe : लाच मागितल्याप्रकरणी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mukesh Vispute
Mukesh Visputeesakal

Dhule Bribe Crime : महसूल प्रशासनाने कारवाई करून ताब्यात घेतलेले ट्रॅक्टर आणि ट्रॉली सोडविण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितल्याच्या संशयावरून येथील प्रांताधिकारी कार्यालयातील शासकीय वाहनचालक मुकेश विसपुते व खासगी पंटर बॉबी सनेर अशा दोन जणांविरोधात बुधवारी (ता. २८) येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. (Dhule Action Against corrupt drivers and punters by anti corruption)

Mukesh Vispute
Crime News: उत्तरप्रदेशातील तुरुंगातून फरार आरोपीला पनवेलमधून अटक

या प्रकरणातील तक्रारदाराचा वीट आणि वाळू पुरवठ्याचा व्यवसाय आहे. त्यांचे ट्रॅक्टर आणि ट्रॉली महसूल विभागाच्या कारवाईत जप्त करण्यात आले होते. ते सोडविण्यासाठी संशयित तथा प्रांताधिकारी कार्यालयातील शासकीय वाहनचालक विसपुते आणि खासगी पंटर सनेर यांनी तक्रारदाराकडे २६ डिसेंबरला २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

लाच दिल्यास प्रांताधिकाऱ्यांशी असलेल्या संबंधांच्या प्रभावाचा वापर करून पडताळणी व वाहन सोडण्याचा आदेश आणून देतो, असे त्यांनी आश्वासन दिले होते. तथापि, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने नाशिक येथे संपर्क साधून तक्रार दिली.

लाच मागितल्याप्रकरणी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक संदीप घुगे तपास करीत आहेत. (latest marathi news)

Mukesh Vispute
Mumbai Crime: पोलिसांना मिळाली टीप अन् 'त्या' आठ परदेशी नागरिकांना झाली अटक!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com