Dhule Crime News : दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद; सोनपोतीसह 7 वाहने हस्तगत

Dhule Crime : शहरात वेगवेगळ्या ठिकाणांहून दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिस उपअधीक्षक एस. हृषीकेश रेड्डी यांच्या पथकाला यश आले.
Police officers and team present after action in vehicle theft case.
Police officers and team present after action in vehicle theft case.esakal

Dhule Crime News : महिलेच्या गळ्यातील सोनपोत ओरबाडणाऱ्या चोरट्यासह शहरात वेगवेगळ्या ठिकाणांहून दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिस उपअधीक्षक एस. हृषीकेश रेड्डी यांच्या पथकाला यश आले. या कारवाईत सोनपोतीसह सात दुचाकी हस्तगत केल्या. यात शहर उपविभागातील तीन, पारोळा (जि. जळगाव) पोलिस ठाण्यातील एक, येवला (जि. नाशिक) पोलिस ठाणे हद्दीतील एक, असे एकूण पाच गुन्हे उघडकीस आले. (Nandurbar Crime gang stole two wheeler from different places in city was arrest)

शहरातील वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरीला गेल्याने पोलिस उपअधीक्षक हृषीकेश रेड्डी यांनी पथकाला दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीविषयी माहिती काढून कारवाईच्या सूचना दिल्या. वसीम येडा ऊर्फ वसीम अहमद साजीद अहम अन्सार (रा. रमजानपुरा, मालेगाव, जि. नाशिक) हा त्याच्या टोळीच्या माध्यमातून धुळ्यात दुचाकी चोरी करत असल्याची माहिती पथकाला मिळाली.

त्यानुसार पथकाने मालेगावला येथे वसीम येडा ऊर्फ वसीम अहमद साजीद अहम अन्सारी, अफसर अली अजगर अली (रा. गोल्डननगर, गोसिया मशिदीजवळ, मालेगाव), शेख साजिद शेख अजीज (रा. जाफरनगर, नूर मशिदीमागे, मालेगाव) या तिघांना अटक केली.

Police officers and team present after action in vehicle theft case.
Nashik Crime News : भुरळ घालून 8 तोळे दागिन्यांवर मारला डल्ला

टोळीतील तीन साथीदार मात्र फरारी आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. चौकशीत तिघांनी दुचाकी चोरल्याची कबुली दिली. तीन लाख २० हजारांच्या सात दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे.

अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक हृषीकेश रेड्डी व पथकातील दत्तात्रय उजे, चंद्रकांत जोशी, कैलास पाटील, कबीर शेख, सुनील पाथरवट, धर्मेंद्र मोहिते, अविनाश वाघ, बापू पाटील, सागर थाटशिंगारे, मकसूद पठाण, विवेक साळुंखे, सोमनाथ चौरे यांनी ही कारवाई केली.

Police officers and team present after action in vehicle theft case.
Pune Crime News : आर्थिक फसवणुकीचे सायबर चोरट्यांना ‘क्रेडिट’

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com