Dhule Crime News : विविध गुन्ह्यातील 6 जण शिरपुर येथून हद्दपार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 court

Dhule Crime News : विविध गुन्ह्यातील 6 जण शिरपुर येथून हद्दपार

धुळे : शिरपूर शहर पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असलेल्या सहा जणांना प्रांताधिकाऱ्यांनी हद्दपार करण्याचे आदेश दिले. त्यांना हद्दपारीच्या कार्यक्षेत्राबाहेर शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी नेऊन सोडले. चौघांना दोन वर्षे, तर दोघांना एका वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.

हेही वाचा: Nashik Crime News : दाराला कुलूप दिसलं कि घरफोडी झालीच!

पोलिसांनी दिलेल्या पत्रकानुसार शिरपूर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे दाखल असलेल्या संशयितांच्या वर्तणुकीत सुधारणा न झाल्याने त्यांना धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्याच्या हद्दीतून हद्दपार करण्यासाठी पोलिस अधीक्षक व प्रांताधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

तो मंजूर करण्यात आला असून गोलू तथा निखिल संजय मराठे, लक्ष्मण तथा भय्या आनंदा मराठे, आनंदा तथा वावड्या दत्तात्रय पाटील (तिघे रा. शिरपूर), मुकेश प्रल्हाद कोळी (रा. सावळदे, ता. शिरपूर) यांना प्रत्येकी दोन वर्षासाठी धुळे जिल्हा तर योगेश विजय शिंपी (रा. शिंगावे, ता. शिरपूर) व सतीश मनोहर मोरे (रा. वरचे गाव, शिरपूर) यांना एक वर्षासाठी धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

हेही वाचा: Dhule News : कर्ज वाढल्याने तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

त्यांच्यावर हद्दपारीच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली असून नंदुरबार, शहादा व मध्य प्रदेशातील खेतिया व सेंधवा येथील पोलिस ठाण्याच्या हदद्दीत शोध पथकाच्या अमलदारांनी सोडले. पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक ए. एस. आगरकर, शोध पथकाचे हवालदार ललित पाटील, लादूराम चौधरी, गोविंद कोळी, विनोद आखडमल, प्रवीण गोसावी, मुकेश पावरा, प्रशांत पवार यांनी ही कामगिरी बजावली.

टॅग्स :DhuleCrime News