Nandurbar News : क्रीडा संकुल आरोग्य मंदिर बनेल! डॉ. विजयकुमार गावित

Nandurbar News : नंदुरबार तालुका क्रीडा संकुल शहरातील आणि ग्रामीण भागातील खेळाडू, नागरिकांचे आरोग्य मंदिर बनेल, असा विश्‍वास राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी व्यक्त केला.
Tribal Development Minister Dr. Vijayakumar Village.
Tribal Development Minister Dr. Vijayakumar Village.esakal
Updated on

नंदुरबार : अत्यंत आकर्षक, खेळाच्या अनुषंगाने सर्व सोई-सुविधांनी परिपूर्ण असणारे नंदुरबार तालुका क्रीडा संकुल शहरातील आणि ग्रामीण भागातील खेळाडू, नागरिकांचे आरोग्य मंदिर बनेल, असा विश्‍वास राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी व्यक्त केला. बहुप्रतिक्षीत तालुका क्रीडा संकूल कामाचे भूमिपूजन गुरुवारी (ता. १०) डॉ. गावित यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ( Dr Vijaykumar gavit statement of Sports complex will become health temple )

या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, तहसीलदार मिलींद कुलथे, हरिभाई पाटील, जे. एन. पाटील, मोहन खानवाणी, प्रा. ईश्‍वर धामणे, लक्ष्मण माळी, बळवंत निकुंभ, संजय होळकर, संतोष वसईकर यांच्यासह पुरस्कारप्राप्त क्रीडा प्रशिक्षक, खेळाडू आणि विद्यार्थ्यांसह परिसरातील व्यापारी, मान्यवर उपस्थित होते. नंदुरबार तालुका क्रीडा संकुलासाठी शासन धोरणाप्रमाणे पाच कोटी, तर व्यापारी संकुलासाठी २० कोटी १७ लाख २३ हजारांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली असून, याठिकाणी एकत्रीत असे जवळपास २५ कोटी रुपये खर्चून अद्यावत तालुका क्रीडा संकूल आणि व्यापारी भवन उभे केले जाणार आहे.

तालुका क्रीडा संकुलाची जागा चांगली आणि मोक्याच्या ठिकाणावर आहे. मात्र, ती अनेक वर्षांपासून उपयोगात आणता आली नाही. आता ती खेळांडूसाठी उपयोगात आणण्याची गरज या वेळी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी व्यक्त केली. डॉ. सुप्रिया गावित म्हणाल्या, तालुका क्रीडा संकुलाच्या माध्यमातून शहारच्या मध्यवर्ती भागात खेळाडूंसाठी चांगली संधी उपलब्ध होणार आहे. खेळाडूंनी याठिकाणी चांगला सराव केला तर उत्तम शरीरासोबत त्यांना खेळात चांगल्या यशाची खात्री मिळेल. जिल्हा क्रीडा संकुल शहरातील नागरीकांना दुर पडत असल्याने या जवळच्या तालुका क्रीडा संकुलाचा नागरीक आणि खेळाडूंनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. (latest marathi news)

Tribal Development Minister Dr. Vijayakumar Village.
Nandurbar Crime News : दरोड्यातील 6 आरोपींना कारावास! दहा हजारांचा दंड; अतिरिक्त सत्र जिल्हा न्यायालयाचा निकाल

भाडे तत्त्वावर गाळे देणार

क्रीडा संकुलात २०० मीटरच्या अद्यावत ट्रॅकसह, बॅडमिंटनचा हॉल, मुव्हेबल बास्केट बॉलचे कोर्ट, कब्बडी आणि खो-खो साठीचे मैदान देखील तयार करण्यात येणार आहे. यासाठी वास्तुविशारदांनी अतिशय उत्तम आणि आकर्षक इमारतीसह मैदानाचे डिझाईन तयार केले आहे. नंदुरबारच्या नागरिकांना याठिकाणी वॉकसाठीची उत्तम सोयदेखील होईल. या क्रीडा संकुलाच्या व्यापारी संकुलात क्रीडा संघटनांसाठी भाडे तत्त्वावर गाळेदेखील उपलब्ध करुन देण्याचा मानस असल्याचे मंत्री डॉ. गावित म्हणाले. नंदुरबार शहरात छत्रपती पुरस्कारविजेते खेळाडू निर्माण करावे लागतील. यासाठी क्रीडा शिक्षक आणि क्रीडाप्रेमींना थोडी मेहनत घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

वातानुकूलीत इनडोर स्टेडीअमचा मानस

व्यापारी बंधूंच्या गाळ्यांचा रखडलेला प्रश्‍न मार्गी लागल्याने क्रीडा विभागाने तातडीने त्यांच्यासमवेत करार करण्याच्या सूचना देखील मंत्र्यांनी दिल्या आहेत. आगामी काळात याठिकाणी वातानुकूलीत इनडोर स्टेडीअम साकारण्याचा मानस असून, त्यासाठी देखील योग्य ती पावले उचलण्यात येतील, असे डॉ. गावित म्हणाले.

जलतरण तलाव होणार अद्यावत

आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये क्षमता आणि लवचिकता खूप असते. नेमबाजीत ते अचूक असतात. याचा फायदा घेवून खेळाडूंची संख्या वाढविण्यासाठी सर्वांनी मेहनती घेण्याची गरज आहे. तालुका क्रीडा संकुलाप्रमाणेच जिल्हा क्रीडा संकुलात सिंथेटीक ट्रॅक निर्माण करण्याचा मानस आहे. याठिकाणचा जलतरण तलाव अद्यावत झाला पाहिजे. त्यासाठी पुढच्या कार्यकाळात काम केले जाईल, असे डॉ. गावित म्हणाले.

Tribal Development Minister Dr. Vijayakumar Village.
Nandurbar News : बिबट्यापासून संरक्षणासाठी वाजविला जातोय डफ; शेतकरी दिलीप होळकर यांनी लढवली नामी शक्कल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com