Dhule Fire Accident : धुळ्यात कपड्यांच्या दुकानाला आग; हजारोंचा माल खाक

Fire damage to a ready-made garment shop on Agra Road in the city.
Fire damage to a ready-made garment shop on Agra Road in the city.esakal

Dhule Fire Accident : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोडवरील फुलवाला चौकाजवळील एका रेडीमेड कपड्यांच्या दुकानाला रविवारी (ता. ७) रात्री आग लागली. आगीत दुकानातील हजारो रुपये किमतीचा माल खाक झाला.

दरम्यान, या दुकानाला लागूनच होलसेल फटाक्यांचे दुकान आहे, सुदैवाने या दुकानापर्यंत आग पोचली नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेची पोलिसांत अग्नी उपद्रवाची नोंद करण्यात आली. (Dhule Fire Accident Fire at clothing shop in Dhule news)

शहरातील आग्रा रोडवर राजेंद्र नानकर यांच्या मालकीचे जीन्स कॉर्नर मेन्स वेअर, सारथी कलेक्शन नावाचे रेडीमेड कपड्यांचे दुकान आहे. शनिवारी (ता. ७) मध्यरात्रीच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे जीन्स कॉर्नर दुकानाला आग लागली.

ही बाब शेजारच्या दुकानदारांच्या लक्षात आली. त्यांनी लागलीच महापालिकेच्या अग्निशमन दलासह दुकानमालकाला घटनेची माहिती कळविली. या दुकानाच्या बाजूलाच होलसेल फटाके विक्रीचे दुकान असल्याने मोठा धोका निर्माण झाला होता.

त्यामुळे नागरिकांसह परिसरातील व्यावसायिकांमध्ये घबराट निर्माण झाली. दरम्यान, घटनास्थळी गर्दीही जमली. माहिती मिळताच महापालिकेचे अग्निशमन बंब दाखल झाले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी दुकानाचे शटर उघडून पाहणी केली असता दुकानाच्या तळमजल्याला आग लागल्याचे लक्षात आले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Fire damage to a ready-made garment shop on Agra Road in the city.
Cyber Crime : लोकांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घालणारा ऑनलाईन 'Gold Trading' स्कॅम माहितेय?

दुकानातील कपडे आणि फर्निचरच्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याने अग्निशामक दलाच्या जवानांना कसरत करावी लागली. मात्र, पाण्याचा मारा करून कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले.

घटनेची माहिती मिळताच आझादनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीत दुकानातील हजारो रुपयांचा माल जळून खाक झाला. शॉर्टसर्किटमुळे ही लाग लागल्याचे दुकानमालक नानकर यांनी सांगितले.

Fire damage to a ready-made garment shop on Agra Road in the city.
Crime News : 'तुला मस्ती आलीये, आता जिवंत सोडत नाही'; इंदोलीत कोयत्याने सपासप वार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com