Dhule News : शिंदखेडा तालुक्याला 86 कोटी : आमदार रावल

Dhule : शिंदखेडा तालुक्यास ८६ कोटींचे दुष्काळी अनुदान मंजूर झाल्याची माहिती माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांनी गुरुवारी (ता. २९) दिली.
Jayakumar Raval performing Bhoomi Pooja for road work.
Jayakumar Raval performing Bhoomi Pooja for road work.esakal

Dhule News : शिंदखेडा तालुक्यास ८६ कोटींचे दुष्काळी अनुदान मंजूर झाल्याची माहिती माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांनी गुरुवारी (ता. २९) दिली. शिंदखेडा तालुक्यातील ६७ हजार ४९२ शेतकऱ्यांना ८६ कोटींचे दुष्काळी अनुदान मंजूर झाल्याचे ते म्हणाले.

राज्यात खरीप २०२३ साठी ४० तालुके दुष्काळी जाहीर झाले. त्यातील शेतकऱ्यांना पुढच्या हंगामासाठी बी-बियाणे, खते खरेदी व शेतीच्या मशागतीसाठी अनुदान म्हणून मदत जाहीर करण्यात आली. (Dhule Former minister and MLA Jaykumar Rawal informed that drought grant of 86 crore approved for Shindkheda taluka)

यात शिंदखेडा तालुक्याचाही सामावेश असून, ८६ कोटींच्या निधीतील लाभ हा तीन हेक्टर क्षेत्रापर्यंतच्या शेतकऱ्यांना मिळणार असून, लवकरच अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे, असे आमदार रावल यांनी सांगितले.

रस्तेकामी भूमिपूजन

दोंडाईचा शहरात मागील सत्ताधाऱ्यांनी घरकुल योजनेच्या नावाने नागरिकांना शहरापासून दूर फेकण्याचे पाप केले. आज अनेक घरकुले शहरापासून दोन ते तीन किलोमीटर लांब आहेत. तेथे वास्तव्य करणारे हे सामान्य, कष्टकरी आहेत. अशांना रोज शहरात यावे लागते. त्यासाठी त्यांना कसरत करावी लागते.

यात मोहम्मदिया घरकुल हे शहरापासून तीन किलोमीटर लांब असून, ते विखुर्ले शिवारात येते. या घरकुलचा रस्ता दयनीय झाला. या रस्त्यासाठी दोन कोटी दहा लाखांचा निधी मंजूर झाला असून, त्यामुळे घरकुले दोंडाईचाला जोडले जाणार असल्याचे प्रतिपादन आमदार रावल यांनी केले. (latest marathi news)

Jayakumar Raval performing Bhoomi Pooja for road work.
Dhule News : महासंस्कृती महोत्सवाची रंगत उत्तरोत्तर वाढे!

रस्त्याच्या कामाचे आमदार रावल यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण महाजन, माजी उपनगराध्यक्ष नबू पिंजारी, माजी बांधकाम सभापती निखिल जाधव, महिला मोर्चाच्या इशरत बानो, नगरसेवक खलील बागवान, किशनचंद दोधेजा, ईश्वर धनगर.

नरेंद्र गिरासे, कृष्णा नगराळे, आकाश कोळी, अहमद शेख, इस्माईल पिंजारी, राजू धनगर, अनिल सिसोदिया, चंद्रकला सिसोदिया, भिकन बागवान आदी उपस्थित होते. आमदार रावल म्हणाले, की घरकुल योजनेस्थळी नागरी सुविधा नाहीत.

त्यामुळे अनेक समस्यांना संबंधित नागरिकांना तोंड द्यावे लागते. रस्त्याचीही दुर्दशा झाली होती. त्यामुळे या कामास मंजुरी मिळवून घेतली. घरकुल योजना परिसरातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे.

Jayakumar Raval performing Bhoomi Pooja for road work.
Dhule News : बांधकाम कामगारांना तालुकानिहाय भांडीवाटप : आमदार कुणाल पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com