Contractual electricity workers stage a half-naked protest in front of Cummins Club on Tuesday for various pending demands.
Contractual electricity workers stage a half-naked protest in front of Cummins Club on Tuesday for various pending demands.esakal

Dhule News : कंत्राटी वीज कामगारांचे धुळ्यात अर्धनग्न आंदोलन

Dhule : कंत्राटी कर्मचाऱ्यांनी क्यूमाईन क्लबजवळ अर्धनग्न आंदोलन करत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले.

Dhule News : महाजेनकोच्या कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे कंत्राटी वीज कामगारांना ३० टक्के पगारवाढ द्यावी, वयाच्या ६० वर्षांपर्यंत शाश्‍वत रोजगाराची हमी द्यावी यांसह इतर विविध मागण्यांसाठी मध्यरात्रीपासून महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना कृती समितीने बेमुदत कामबंद धरणे आंदोलन पुकारले आहे. दरम्यान, या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी (ता. ५) कंत्राटी कर्मचाऱ्यांनी क्यूमाईन क्लबजवळ अर्धनग्न आंदोलन करत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले. (Dhule Half naked moments of contract electricity workers)

अनेक दिवसांपासून कंत्राटी वीज कामगारांच्या मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांसाठी वारंवार लक्ष वेधूनही दखल घेतली जात नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. याचाच एक भाग म्हणून राज्यभरातील कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध टप्प्यांत हे आंदोलन सुरू आहे.

यात एकदिवसीय धरणे आंदोलन, तिन्ही कंपन्यांतील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ४८ तास कामबंद आंदोलन करण्यात आले. यानंतरही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे या आंदोलनाचा शेवटचा टप्प्यात कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून बेमुदत कामबंद धरणे आंदोलन सुरू केले.

Contractual electricity workers stage a half-naked protest in front of Cummins Club on Tuesday for various pending demands.
Dhule News : खानदेशात भारत जोडो यात्रा ऐतिहासिक ठरणार : बाळासाहेब थोरात

या कामबंद आंदोलनाच्या पहिल्या दिवशी सर्व कर्मचाऱ्यांनी क्यूमाईन क्लबजवळील धरणे आंदोलनस्थळी अर्धनग्न आंदोलन केले. या आंदोलनात कृती समितीचे नचिकेत मोरे, दीपक ओतारी, नीलेश खरात, वामन बुटले, भाई भालाधरे, डी. जी. तायडे, शंकर गडाख, सुरेश भगत, विक्की कावळे, सतीश तायडे, संजय पडोळे.

वामन मराठे, निताई घोष, रमेश गणोरकर, राहुल नागदेवे, प्रफुल्ल सागोरे, गणेश सपकाळे, कैलास नेमाडे, राजेश पखिड्डे, अरुण दामोदर, बंडू हजारे, मंगेश चौधरी, राजेश पखिड्डे, संदीप बांदेकर, सचिन मेंगाळे, अजित नरवणकर, रोशन गोस्वामी यांच्यासह इतर कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

Contractual electricity workers stage a half-naked protest in front of Cummins Club on Tuesday for various pending demands.
Dhule News : धुळे जिल्ह्यात 29 ठिकाणी नाकाबंदी; सातशेवर वाहनांची तपासणी

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com