Dhule News : हद्दवाढ गावांतील कामांना 5 कोटी मंजूर : आमदार कुणाल पाटील

Dhule : गावांमध्ये रस्ता काँक्रिटीकरण, सभामंडप यांसह विविध विकासकामांसाठी एकूण पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
MLA Kunal Patil
MLA Kunal Patilesakal

Dhule News : धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील धुळे महापालिका क्षेत्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये रस्ता काँक्रिटीकरण, सभामंडप यांसह विविध विकासकामांसाठी एकूण पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यात वरखेडी गावाजवळील अन्वर नाल्यावर फरशीपूल बांधकामासाठी एक कोटी रुपये निधीचा समावेश आहे, अशी माहिती आमदार कुणाल पाटील यांनी दिली. (Dhule MLA Kunal Patil statement 5 crore approved for work in demarcated villages)

१५ मार्च २०२४ ला नगरविकास विभागाने शासन निर्णयातून या कामांना मंजुरी दिली. त्यात वलवाडी प्रभाग ६ मध्ये रस्ता काँक्रिटीकरणासाठी ४० लाख, नकाणे गाव दरवाजा ते वलवाडी गावापर्यंत गटार व रस्ता काँक्रिटीकरणासाठी ६० लाख, वरखेडे येथील अन्वर नाल्यावर महादेव मंदिराकडे जाण्यासाठी फरशीपुलासाठी एक कोटी.

वरखेडे येथे रस्ता काँक्रिटीकरणासाठी २० लाख, प्रभाग ६ मध्ये सभामंडपासाठी १५ लाख, प्रभाग ५ मध्ये रस्ता काँक्रिटीकरणासाठी २० लाख, नकाणे रोड येथे रस्ता काँक्रिटीकरण व गटारासाठी २१ लाख, नंदनवन सोसायटी नदीकिनारी संरक्षक भिंतीसाठी २५ लाख. (latest marathi news)

MLA Kunal Patil
Dhule News : शिंदखेडा शहरासाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण; आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्‌घाटन

मौजे मोराणे प्र.ल. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँक्रिटीकरणासाठी २० लाख, प्रभाग ६ मध्ये काँक्रिट गटार व रस्ता काँक्रिटीकरणासाठी २० लाख.

वलवाडी धनदाईनगर येथे रस्ते डांबरीकरणासाठी ६०, वलवाडी इंद्रप्रस्थ कॉलनीत रस्ते डांबरीकरणासाठी ५० लाख, महिंदळे सर्व्हे क्रमांक २ येथे वॉल कंपाउंडसाठी २५ लाख, प्रभाग ५ मध्ये रस्ता काँक्रिटीकरणासाठी २४ लाख रुपये आदी कामांचा यात समावेश आहे. आपल्या प्रयत्नातून ही कामे मंजूर झाल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.

MLA Kunal Patil
Dhule Lok Sabha Election : लोकसभा निवडणूक प्रक्रियेसाठी समन्वय ठेवा : जिल्हाधिकारी अभिनव गोयल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com