Dhule News : 33 लाखांची थकबाकी; मनपातर्फे 3 दिवस मुदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhule Municipal Corporation

Dhule News : 33 लाखांची थकबाकी; मनपातर्फे 3 दिवस मुदत

धुळे : शहरातील गल्ली क्रमांक चारमधील मालमत्ताधारकाने ३३ लाख रुपयांचा कर थकविल्याने पथक जप्तीसाठी गेले. मात्र, मालमत्ताधारक गावी गेल्याने त्याला महापालिकेने प्रतिसादासाठी तीन दिवसांची मुदत दिली.

शहरातील पाट बाजार येथे प्रकाश चौधरी यांच्या मालकीची इमारत आहे. चौधरी हॉस्पिटलच्या वरील मजल्यावर बँक ऑफ इंडिया आहे. या मालमत्तेवर ३३ लाखांची थकबाकी आहे. त्यात २५ लाखांचा मालमत्ता कर आणि सात लाखांची शास्ती, असे थकबाकीचे स्वरूप आहे. (Dhule municipal corporation 33 lakh tax pending 3 days deadline dhule news)

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

हेही वाचा: Swachha Sarvection 2023: गरज 15 टन, मिळतो फक्त दीड टन ओला कचरा!वेस्ट एनर्जी प्रकल्प टिकविण्याची NMCची धडपड

आयुक्तांच्या आदेशानुसार वसुली अधीक्षक शिरीष जाधव, मधुकर निकुंभे, वसुली निरीक्षक अजय देवरे, मनोज शिलेरे, मधुकर वडनेरे, शुभम जाधव शुक्रवारी (ता. २०) मालमत्ता सील करण्यासाठी गेले.

मात्र, मालमत्ताधारक चौधरी बाहेरगावी असल्याने पथकाने आयुक्तांशी संपर्क साधला. मालमत्ताधारक चौधरी यांनी मोबाईलद्वारे आयुक्तांशी संपर्क केला. गावाहून परतल्यावर २३ जानेवारीला कर भरणा करेन, अशी ग्वाही श्री. चौधरी यांनी दिली. त्यामुळे आयुक्तांनी त्यांना तीन दिवसांची वाढीव मुदत दिली

हेही वाचा: Nashik News : निधी खर्चासाठी ZPत धावपळ; तालुकानिहाय पंचायत समित्यांमध्ये बैठकांचा सपाटा