रुग्णांकडून आकारलेल्या सर्व बिलांचे रोज ऑडिट

रुग्णांकडून आकारलेल्या सर्व बिलांचे रोज ऑडिट

नऊ लेखापरीक्षकांच्या नियंत्रणाखाली पथके कार्यरत आहेत ते हॉस्पिटलनिहाय तपासणीची करणार आहे.



धुळे : शहर व परिसरातील खासगी दवाखान्यांकडून (Private hospital) कोरोना रुग्णांवरील (corona patient) उपचारांसह (Treatment) रुग्णवाहिका (Ambulance) व इतर उपकरणांबाबत अवाजवी दर आकारणीचे प्रकार घडत आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी महापालिकेकडून ( Dhule Municipal Corporation) लेखापरीक्षण पथकांकडून ((Audit teams) तक्रारींच्या अनुषंगाने बिलांची (Bill) तपासणी करून नागरिकांना दिलासा देण्यात आला आहे. त्यानंतर आता कोविड सेवा देणाऱ्‍या सर्व हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांकडून आतापर्यंत आकारलेल्या सर्व बिलांचे ऑडिट होणार आहे. तसेच दैनंदिन ऑडिटही केले जाणार आहे. याकामी आयुक्त अजीज शेख यांनी मनपास्तरावर पथकांची नियुक्ती केली आहे. तसेच कोरोना रुग्णांची बिले जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

(dhule municipal corporation audit teams treatment corona patient bille check)

रुग्णांकडून आकारलेल्या सर्व बिलांचे रोज ऑडिट
रुग्णांचा जीव टांगणीला अन्‌ म्हणे ‘ट्रायल’ घेत होते..!

खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या कोविडबाधित रुग्णांकडून शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक शुल्क आकारल्याच्या तक्रारी शासनस्तरावर प्राप्त होत आहेत. याबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल झाली आहे. याबाबत राज्याच्या सचिवांनी रुग्णालय व रुग्णवाहिकांचे वाजवी शुल्क आकारणीची अंमलबजावणी तपासाणीसाठी लेखापरीक्षक नेमण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने शहर भाग सहाय्यक आयुक्त विनायक कोते व देवपूर भाग तुषार नेरकर यांच्या नियंत्रणाखाली लेखापरीक्षण पथके तयार करण्यात आली आहेत. यात नऊ लेखापरीक्षकांच्या नियंत्रणाखाली पथके कार्यरत आहेत. त्यांच्याकडे हॉस्पिटलनिहाय तपासणीची जबाबदारी सोपविली आहे.

रुग्णांकडून आकारलेल्या सर्व बिलांचे रोज ऑडिट
आता हद्दच झाली ना राव..कोरोना रुग्णाचे बेडवरून पैसे चोरले !

सहाय्यक लेखापरीक्षा अधिकारी दि. शा. अवसरमल शहर भाग व सहाय्यक लेखापरीक्षा अधिकारी व. भू. कोळपे देवपूर भागातील काम पाहतील. पथकातील प्रत्येक कर्मचाऱ्‍याने संबंधित हॉस्पिटलकडून कोविड-१९ रुग्णांची आजपर्यंत सर्व देयके लेखापरीक्षणासाठी रुग्णालयाकडून प्राप्त करून घ्यावयाची आहेत. कर्मचाऱ्‍यांनी रुग्णांची देयके अंतिम करण्यापूर्वी ती लेखापरीक्षकांकडून तपासून घ्यावीत. देयकांचे लेखापरीक्षण त्याच दिवशी करण्यात यावे, अवाजवी बिल आकारणीचा प्रकार निदर्शनास आल्यास संबंधित कर्मचाऱ्‍यांनी विनाविलंब संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी. यात हलगर्जी आढळल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असेही आयुक्त अजीज शेख यांनी आदेशात म्हटले आहे.

(dhule municipal corporation audit teams treatment corona patient bille check)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com