Dhule Municipal Corporation : ‘विद्युत’ च्या अभियंत्यांची बैठकीतही उडवाउडवी; समस्या सोडविण्याच्या सूचना

Dhule Municipal Corporation
Dhule Municipal Corporationesakal

Dhule News : शहरातील बंद पथदीपांच्या प्रश्‍नावर महापालिकेच्या विद्युत विभागातील अभियंत्यांनी स्थायी समिती सभापतींनी बोलावलेल्या बैठकीतही उडवाउडवी उत्तरे दिल्याचे दिसून आले. त्यामुळे सभापती, अतिरिक्त आयुक्तांनी अभियंत्यांना ताकीद देत तत्काळ समस्या सोडविण्याच्या सूचना दिल्या. यानंतरही शहरातील पथदीपांची समस्या सुटेल की नाही याबाबत साशंकता आहे.

शहरातील अनेक भागात पथदीप बंद आहेत. त्यामुळे विविध भागातील नागरिकांसह नगरसेवकांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहेत. बंद पथदीपांच्या या प्रश्‍नावर माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर यांनी तर विद्युत विभागाचे सहाय्यक अभियंता एन. के. बागूल यांच्यावर कारवाई करा अन्यथा उपोषण करेन असा इशारा दिला.(Dhule Municipal Corporation Update In meeting of engineers of electricity not properly answer Troubleshooting suggestions Dhule News)

याशिवाय मागील अनेक स्थायी समिती सभांमध्ये सदस्यांनी पथदीपांच्या समस्या मांडल्या. त्यानंतरही काहीही कार्यवाही झाली नाही. या वाढत्या समस्येच्या पार्श्वभूमीवर स्थायी समिती सभापती किरण कुलेवार यांनी सोमवारी (ता.१९) महापालिकेत विद्युत विभागाच्या अभियंत्यांची बैठक घेतली. इतर विभागांचाही त्यांनी आढावा घेतला.

नगरसेवक हर्षकुमार रेलन, अतिरिक्त आयुक्त विजय सनेर उपस्थित होते. विद्युत विभागाकडे नागरिक तक्रारी करतात मात्र त्यांची दखल घेतली जात नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. शहरापेक्षा ग्रामीण भाग उजळलेला दिसून येता. त्यामुळे पथदीपांची समस्या तत्काळ सोडवावी अशा सूचना सभापती श्रीमती कुलेवार यांनी बैठकीत दिल्या.

बैठकीत मात्र कंत्राटी अभियंत्यांकडूनही उडवाउडवीची उत्तरे पाहायला मिळाली. त्यामुळे सभापती श्रीमती कुलेवार यांच्यासह अतिरिक्त आयुक्त श्री. सनेर यांनी या अभियंत्यांना ताकीद दिली. पथदीपांच्या प्रश्‍नांवर श्री. रेलन यांनी आमच्या प्रभागासह शहरातील अनेक भागातील पथदीप बंद आहेत. तक्रारी करून दुरुस्ती होत नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dhule Municipal Corporation
Dhule News : डोंगरगावच्या शेतकऱ्याची रेल्वेखाली आत्महत्या

अभियंते फोन उचलत नाही. अभियंत्यांनी फोन उचलले तर हा समस्या सुटण्यास मदत होईल असे सांगितले. त्यावर सभापती श्रीमती कुलेवार यांनी सर्व प्रभागातील माहिती घेऊन ठेकेदारासह बैठक लावण्यासह प्रभागातील पथदीप त्वरित लावण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना अभियंत्यांना दिल्या.

मांस विक्रेत्यांना नोटिसा द्या

बाजार विभाग व आरोग्य विभागाने शहरातील उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना नोटिसा द्याव्यात. साक्री रोडवरील ओट्यांचा लिलाव करावा. तसेच, पंतप्रधान आवास योजनेबाबत प्रभाग क्रमांक-७ मधील जागेचे ड्रोनने मॅपिंग करून पक्के घरे, कच्च्या घरांचे सर्वेक्षण करून माहिती सादर करावी.

एलबीटी वसुलीसाठी निवृत्त अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. मनपा कर्मचाऱ्यांमार्फत नोटिसा देऊन लवकरात लवकर एलबीटी वसूल करावी. लेखा विभागातील डबल एन्ट्री सिस्टीमचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशा सूचनाही सभापती श्रीमती कुलेवार यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

Dhule Municipal Corporation
Dhule Water Supply News : देवपूर भागास एक दिवस उशिरा पाणीपुरवठा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com