Dhule Municipal Corporation
sakal
धुळे: हद्दवाढीतील भागासह संपूर्ण महापालिका क्षेत्रातून घरोघरीचा कचरा संकलन व वाहतूक, तसेच गटार व नाल्यातील गाळ संकलन, घनकचरा व्यवस्थापनाच्या कामावर देखरेख, त्यासाठी मनुष्यबळ पुरविण्याचे काम भाग्यदीप वेस्ट मॅनेजमेंट प्रा. लि. यांना देण्यास महापालिकेच्या प्रशासकीय स्थायी समिती सभेने मान्यता दिली. याकामी वर्षाकाठी तब्बल १८ कोटी ३२ लाखांवर खर्च होणार आहे. दरम्यान, मनपाच्या बालवाडी शिक्षिका, मदतनीसांचे मानधन वाढविण्यासह मंजुरी देण्यात आली.