Ahirani Sahitya Sammelan : सातवे अहिराणी साहित्य संमेलन नेरला

Dhule News : खानदेश साहित्य संघ महाराष्ट्र, धुळे व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्यातर्फे सातवे अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन २५ फेब्रुवारीला नेर (ता. धुळे) येथे होणार आहे.
Ahirani Sahitya Sammelan
Ahirani Sahitya Sammelanesakal

Dhule News : खानदेश साहित्य संघ महाराष्ट्र, धुळे व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्यातर्फे सातवे अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन २५ फेब्रुवारीला नेर (ता. धुळे) येथे होणार आहे. या एकदिवसीय साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी डॉ. सुधीर देवरे, तर स्वागताध्यक्षपदी आमदार कुणाल पाटील यांची निवड झाली. आदर्श सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांच्या हस्ते अहिराणी साहित्य संमेलनाचे उद्‍घाटन होईल.

९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. भारत सासणे विशेष अतिथी असतील. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. पुष्पराज गावंडे, डॉ. धनंजय गुडसरकर, प्रसिद्ध साहित्यिक मीनाक्षी पाटील संमेलनाला उपस्थित असतील.

नेर येथील स्वातंत्र्यसैनिक स्व. अण्णासाहेब चूडामण पाटील साहित्य नगरीत हे साहित्य संमेलन होईल. यापूर्वीच्या सहा संमेलनांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. अहिराणी साहित्य संमेलनाची ही परंपरा कायम ठेवत अहिराणी भाषा व साहित्याच्या वृद्धीसाठी संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाची धुरा आपल्या खांद्यावर घेत उत्तम पद्धतीने नियोजन करणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

कार्यक्रमांची रेलचेल

ग्रंथदिंडी, उद्‍घाटन सत्र, पुस्तक प्रकाशन, पुस्तक प्रदर्शन, परिसंवाद, कथाकथन, चार सत्रांमध्ये अहिराणी भाषेतील कवितांचे सादरीकरण होणार आहे. दिवसभर चालणाऱ्या या संमेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक तथा खानदेश साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. सदाशिव सूर्यवंशी.

Ahirani Sahitya Sammelan
Dhule News : दुसाणे बसस्थानक परिसरातील अतिक्रमण जमीनदोस्त; 60 वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न निकाली

सचिव कवी रमेश बोरसे, प्राचार्या रत्ना पाटील, रमेश राठोड व इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे. साहित्य संमेलनासाठी विशेष कार्य अधिकारी प्रकाश पाटील, कवी जगदीश देवपूरकर, रमेश बोरसे, सुभाष अहिरे, प्राचार्या रत्ना पाटील, प्रा. रमेश राठोड, प्रा. अशोक शिंदे, शाहीर नानाभाऊ पाटील, गोकुळ पाटील, शरद धनगर.

डॉ. नरेंद्र खैरनार, डॉ. कुणाल पवार, हेमलता पाटील, चूडामण पाटील, विजय पाटील, देवदत्त बोरसे, जितेंद्र चौधरी, प्रवीण देवरे, सुनीता बोरसे, जितेंद्र बहारे, सुनीता पाटील, के. बी. लोहार, शाहीर श्रावण वाणी, वीरेंद्र बेडसे, डॉ. भय्या पाटील, बाळासाहेब गिरी, दिनेश चव्हाण, गणेश पाटील आदी परिश्रम घेत आहेत.

संमेलनाध्यक्षांची २८ पुस्तके

संमेलनाध्यक्ष डॉ. देवरे यांनी २८ पेक्षा जास्त पुस्तकांचे लेखन केले असून, विविध ग्रंथांचेही संपादनही केले आहे. अहिराणी भाषा, कला, लोकजीवन व लोकवाङ्‍मयाचे ते अभ्यासक आहेत. लिखाणासाठी असंख्य पुरस्कारांनीही त्यांना गौरविण्यात आले आहे.

Ahirani Sahitya Sammelan
Dhule Municipality News : ‘स्थायी’त 33 कोटींवर खर्चाची निविदा मंजूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com