आम्हाला मदत करा; आगीमुळे ओळखही झाली नष्ट

एल.बी.चौधरी
बुधवार, 16 ऑगस्ट 2017

मंगळवारी दुपारी दोन वाजता महिला ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. मात्र ग्रामसभेत सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांचेसह महिला सदस्या हजर नसल्याने महिला ग्रामसभा अक्षरशः गुंडाळण्यात आली. महिला ग्रामसभेला महिलाच येत नाहीत असे सांगण्यात आले. 

सोनगीर (जि. धुळे) : झोपडी जळून सर्वस्व खाक झाले. संसारोपयोगी भांडी, कपडे, अन्नधान्य, मुलांचे दप्तर एवढेच नव्हे तर रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड आगीच्या स्वाधीन झाल्याने आमची ओळखही नष्ट झाली. उपासमारीची वेळ आली आहे. आम्हाला काही मदत करा अशी आर्त मागणी कमलबाई राजधर भील व सिंधूबाई अमृत भील यांनी उपसरपंच धनंजय कासार यांच्याकडे केली.

मंगळवारी दुपारी दोन वाजता महिला ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. मात्र ग्रामसभेत सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांचेसह महिला सदस्या हजर नसल्याने महिला ग्रामसभा अक्षरशः गुंडाळण्यात आली. महिला ग्रामसभेला महिलाच येत नाहीत असे सांगण्यात आले. 

येथे शुक्रवारी रात्री लागलेल्या आगीत सुरेेश राजधर भील या गरीब आदिवासी कुटुंबाची झोपडी जळून खाक झाले. त्यात घरगुती साहित्य व रोख रक्कमेसह  सुमारे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले. येथील सबरगडाच्या पायथ्याशी सुरेश राजधर भील हे पत्नी व तीन मुलांसह एका छोट्याश्या झोपडीत रहातात. पती - पत्नी मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालवतात. रात्री साडेबाराच्या सुमारास घराला आग लागली मात्र तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध न झाल्याने व झोपडी चारा व लाकडाची असल्याने व त्यातच रात्रीची वेळ म्हणून आगीने रौद्ररूप धारण केले. त्यात घरगुती साहित्य, कपडे, अन्नधान्य, दवाखाना व अन्य कारणासाठी जमवलेले रोख पाच हजार रुपये आदी जळून खाक झाले.

सुमारे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज तलाठी जे. बी. बांगर यांनी केलेल्या पंचनाम्यात व्यक्त केला. पै पै जमा करून उभा केलेला संसार एका रात्रीत नष्ट झाला. उपासमारीची वेळ आली. म्हणून ग्रामपंचायतीकडे मदत मागितली. उपसरपंच धनंजय कासार यांनी मदतीचे आश्वासन दिले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शामलाल मोरे, ग्रामपंचायत सदस्य विशाल मोरे, प्रेमल पाटील, किशोर पावनकर उपस्थित होते. दरम्यान महिला ग्रामसभा आवश्यक असतांना महिला तसेच ग्रामपंचायत सदस्य हजर राहत नसतील तर शासनाच्या उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचे चित्र दिसून आले.

Web Title: Dhule news fire in songir