Dhule Crime News : धुळे पोलिसांनी हस्तगत केल्या चोरीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू; अनेक दुकानदारांना गंडविल्याचे उघड

Officials present during the inspection after the city police seized the stolen items.
Officials present during the inspection after the city police seized the stolen items. esakal

Dhule Crime News : शहर पोलिस ठाण्याच्या शोधपथकाने चोरीच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू हस्तगत करण्याची कामगिरी केली. शहरातील प्रबोधनकार ठाकरे व्यापारी संकुलातील के. व्ही. एंटरप्राइजेस या इलेक्ट्रॉनिक दुकानात १८ मेस रात्री नऊनंतर दोन दुचाकीवरून चार ग्राहक आले. यात पुरुष आणि तीन अनोळखी महिला होत्या. (Dhule police seized stolen electronic goods crime news)

त्यांनी दुकानातील कर्मचाऱ्यांना बोलण्यात गुंतवून ठेवत दुकानाबाहेर थांबलेली एक अनोळखी महिला व पुरुषाच्या सहाय्याने किमती एससीच्या इनडोअर युनिटची चोरी केली. तसेच बांबू गल्लीतील अमोल टीव्ही, देवपूरमधील सिस्टेल क्लासजवळील सौजन्य सेल्स आदी ठिकाणी अशा प्रकारे चोरीच्या घटना घडल्या होत्या. याअनुषंगाने पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी शहराचे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांना गुन्ह्यास प्रतिबंध करणे व गुन्हे उघडकीस आणण्याचे निर्देश दिले.

श्री. कोकरे यांनी शहर पोलिस ठाण्याची शोधपथके नेमून सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने संशयित महेश अशोक केवारे (वय २७, रा. हमाल मापाडी, कृष्णवाडी, दत्तमंदिरासमोर, धुळे) याची चौकशी केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Officials present during the inspection after the city police seized the stolen items.
Crime News : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास तीन वर्षे सक्तमजुरी

त्याच्याकडे चोरीचा एसी, ओनिडा टीव्ही, वायरलेस सिस्टिम स्पीकर असल्याचे निष्पन्न झाले. या इलेक्ट्रॉनिक वस्तू संबंधित दुकानातून चोरल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी दाखल गुन्ह्यात संशयित केवारे याला अटक करण्यात आली.

त्याच्या चौकशीत आणखी दोन गुन्हे उजेडात आले. गुन्हे करताना वाहनांचा वापरही त्याने केला. त्याच्याकडून एक लाख ९६ हजार ४८९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. श्री. बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपअधीक्षक हृषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचे पोलिस निरीक्षक कोकरे यांच्या पथकातील कर्मचारी मच्छिंद्र पाटील, गिरासे, प्रसाद वाघ, नीलेश पोतदार, गुणवंत पाटील, शिरसाट, पटाईत, मोरे, कराड, पाटील, सोनगिरे, शेख यांनी ही कामगिरी केली.

Officials present during the inspection after the city police seized the stolen items.
Nandurbar News : अमली पदार्थमुक्त जिल्हा अभियानात 71 लाखांवर मुद्देमाल हस्तगत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com