Dhule News : आगीच्या अफवेने बाजारपेठेत धावपळ; सराफ बाजाराकडे बंब वळविण्यासाठी तब्बल अर्धा तास

Dhule : ‘मोठी आग लागली आहे, तातडीने निघा’, असा संदेश मिळाल्याने पालिकेच्या अग्निशमन दलाचे दोन बंब सुसाट वेगाने निघाले.
A fire bomb that entered the market.
A fire bomb that entered the market.esakal

Dhule News : ‘मोठी आग लागली आहे, तातडीने निघा’, असा संदेश मिळाल्याने पालिकेच्या अग्निशमन दलाचे दोन बंब सुसाट वेगाने निघाले. त्यांच्या पाठोपाठ गर्दीही निघाली. मोठ्या खटपटीने फेरीवाले, हातगाड्या दूर करून बाजारात प्रवेश मिळविला. घटनास्थळी पोचल्यावर मात्र सर्वांचा जीव भांड्यात पडला. मोठी आग वगैरे नसून कचरा जाळल्याचे निष्पन्न झाले.

शुक्रवारी (ता. २३) सकाळी शहरातील बाजारपेठेच्या मध्यवर्ती भागात महात्मा गांधी मार्केटच्या मागील बाजूने काळेशार धुराचे लोट बाहेर पडताना दिसले. (Rumors of fire)

त्यामुळे जागरूक नागरिकांनी पोलिसांच्या ११२ नंबरशी संपर्क साधून माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोचण्यापूर्वीच पालिकेला अग्निशमन दल पाठविण्याचे निर्देश दिले. त्यामुळे सायरन वाजवत पालिकेचे दोन बंब घटनास्थळी पोचले.

मात्र बाजारपेठेतील गर्दीतून वाट काढताना चालक मेटाकुटीला आले होते. शहरातील भैरव राममंदिरापासून सराफ बाजाराकडे बंब वळविण्यासाठी तब्बल अर्धा तास लागला. सराफ बाजारातील गांधी मार्केटमागे अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या पाय विहिरीच्या परिसरात सकाळी एक गॅरेजवरील मुलाने जुनाट टायर पेटवले.

A fire bomb that entered the market.
Dhule Municipality News : थकबाकीदारांनो, अभी नही तो कभी नही..! मनपा प्रशासनाचा इशारा

हा परिसर अरुंद असल्यामुळे धुराचे लोट वरपर्यंत पोचले. आग नेमकी कुठे लागली आहे, हे लक्षात न आल्याने तेथील घरालाच आग लागल्याचा समज झाल्याने आगीची अफवा पसरली.

उपाययोजना करण्याची नागरिकांची अपेक्षा

आग लागण्याच्या अशा आणीबाणीच्या प्रसंगात सराफ बाजारात मदतीसाठी वाहने वळविणे किती कठीण आहे, हे पुन्हा एकदा दिसून आले. त्यावर उपाययोजना करण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

A fire bomb that entered the market.
Dhule News : मुद्रांक शुल्क अभय योजनेचा लाभ घ्या; गायकवाड यांचे आवाहन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com