MLA Kashiram Pawara inspecting the horses in the cattle fair
MLA Kashiram Pawara inspecting the horses in the cattle fairesakal

Dhule News : शिरपूरच्या पशुबाजारात पाऊण कोटीची उलाढाल

Dhule : श्री खंडेराव महाराज यात्रेनिमित्त बाजार समितीच्या आवारात भरविण्यात आलेल्या पशू मेळाव्यात जनावरांच्या खरेदी-विक्रीतून सुमारे पाऊण कोटी रुपयांची उलाढाल झाली.
Published on

Dhule News : येथील श्री खंडेराव महाराज यात्रेनिमित्त बाजार समितीच्या आवारात भरविण्यात आलेल्या पशू मेळाव्यात जनावरांच्या खरेदी-विक्रीतून सुमारे पाऊण कोटी रुपयांची उलाढाल झाली. जातिवंत अश्व आणि बैल खरेदी करण्यासाठी महाराष्ट्रासह विविध राज्यांमधून अश्वशौकीन व शेतकऱ्यांची गर्दी होत आहे.

आमदार काशीराम पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, बाजार समितीचे सभापती के. डी. पाटील यांच्या हस्ते पशू मेळाव्याचे औपचारिक उद्‍घाटन करण्यात आले. (Dhule turnover of Rs 5 crores in animal market of Shirpur)

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तुषार रंधे, भाजपचे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, माजी सभापती नरेंद्रसिंह सिसोदिया उपस्थित होते. जनावरे बाजार व यात्रा उपसमिती सभापती मिलिंद पाटील यांनी प्रास्ताविकात पशू मेळाव्याबाबत माहिती दिली.

उपसभापती लक्ष्मीकांत पाटील, संचालक डॉ. किरण गुजराथी, अरविंद पाटील, शांतिलाल जमादार, चंदू पाटील, शिवाजी पाटील, विठोबा महाजन, मनीषा मराठे, मेघा पाटील, प्रसाद पाटील, कृष्णा पावरा, आनंदसिंह राऊळ, जगन पावरा, अर्पित अग्रवाल, सतीश जैन, किरण कढरे उपस्थित होते.

तौफीक अहमद अब्दुल सत्तार (रा. धौरातांडा, उत्तर प्रदेश) यांच्या मालकीचा उमदा अश्व दीड लाख रुपये किमतीला बाबू खंडू काळे (रा. मुळशी, जि. धाराशिव) यांनी विकत घेतला. अब्दुल रशीद अब्दुल समद (रा. नवाबगंज, उत्तर प्रदेश) यांचा अश्व एक लाख २५ हजार रुपये देऊन मनोज प्रेमलाल मालवीय (रा. सेंधवा, मध्य प्रदेश) यांनी विकत घेतला. (Latest Marathi News)

MLA Kashiram Pawara inspecting the horses in the cattle fair
Dhule News : वडणे येथील प्राथमिक शिक्षक निलंबित; सीईओ गुप्तांकडून कारवाई

अमोल आनंदा खैरनार (रा. शिरपूर) यांची बैलजोडी सव्वा लाख रुपयांना नामदेव दंगल ठाकरे (रा. पाष्टे, ता. शिंदखेडा) यांनी विकत घेतली. यात्रा समितीचे अध्यक्ष मिलिंद पाटील व सहकारी संयोजन करीत आहेत.

३६५ जनावरांची विक्री

पशू मेळाव्यात ७८३ जनावरे विक्रीसाठी दाखल झाली असून, त्यांपैकी ३६५ जनावरांची विक्री झाली. ८९ अश्व विक्रीसाठी उपलब्ध असून, १८ घोड्यांची विक्री झाली आहे. पंजाब, सिंध, मारवाडी, काठेवाडी जातीचे अश्व येथे आहेत. चांगल्या प्रतीचे बैलदेखील बाजारात असून, त्यांच्या खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. जनावरांच्या खरेदी-विक्रीतून ७० लाख ९८ हजार ८०० रुपयांची उलाढाल झाली.

MLA Kashiram Pawara inspecting the horses in the cattle fair
Dhule Municipality News : मनपाचे 1,728 कोटींचे अंदाजपत्रक मंजूर; हद्दवाढीत 22 जलकुंभ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com