भुसावळ- दीपनगर औष्णिक वीज केंद्राच्या प्रवेशद्वारासमोर उभ्या वाहनांमधून डिझेल चोरी करणाऱ्या चौघांच्या टोळीला गस्तीवर असलेल्या पोलिसांनी सतर्कतेने गजाआड केले. ट्रेलर, बल्कर या वाहनांच्या डिझेल टाकीतून नळी टाकून थेट कारच्या डिकीमध्ये चौघे डिझेल कॅनमध्ये भरत असताना पोलिसांना आढळून आले. दरम्यान, पोलिसांना पाहताच चौघांनी मुक्ताईनगरच्या दिशेने पळ काढला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्यांना अटक केली. ही घटना शुक्रवारी (ता. ७) सकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.