
बेपत्ता प्रौढाची जंगलात आत्महत्या
धुळे : शहरातून बेपत्ता व्यक्तीचा गळफास घेतलेल्या स्थितीतील मृतदेह रविवारी (ता.२९) पुरमेपाडा (ता.धुळे) शिवारातील जंगलात आढळला. संभाजी कचरू सुतार (वय ५४, रा. स्वामी नारायण कॉलनी, दाता सरकार मंगल कार्यालयामागे, धुळे) असे त्यांचे नाव आहे. या प्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात नोंद झाली.
संभाजी सुतार २७ मेस सकाळी पावणेआठच्या सुमारास कटिंग करून येतो, असे घरातील सदस्यांना सांगत दुचाकीने (क्रमांक : एमएच १८ बीएस १७८३) निघाले. सायंकाळपर्यंत ते परत न आल्याने कुटुंबीयांनी आझादनगर पोलिस ठाण्यात हरविल्याची माहिती दिली. तालुका पोलिसांनी रविवारी दुपारी साडेतीनला सुतार कुटुंबीयांशी संपर्क साधला. पुरमेपाडा (ता. धुळे) शिवारातील जंगलात दुचाकी उभी आहे. लगतच्या झाडाला एक व्यक्ती गळफास घेतलेल्या स्थितीत असल्याची माहिती दिली. नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेतली असता ते संभाजी सुतार असल्याचे आढळले. झाडाच्या उंचावर गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळल्याने मृतदेह उतरवणे जिकरीचे झाले होते. जेसीबीच्या मदतीने उंच फांदी खाली करून मृतदेह उतरवण्यात आला. त्यासाठी ग्रामस्थांनी मदत केली. सुतार यांच्या आत्महत्येमागील कारण समजले नाही.
हेही वाचा: भरधाव ट्रॅक्टर उलटून मुलाचा जागीच मृत्यू
हेही वाचा: विवाहितेवर अत्याचार; सासरच्यांच्या अनैतिक कृत्यांचे फुटले बिंग
Web Title: Disappeared Adult Commits Suicide In The Forest Dhule News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..