To welcome Mahila Samman Yojana, BJP Zilla Parishad office bearers and members reached the Zilla Parishad by traveling by ST bus.
To welcome Mahila Samman Yojana, BJP Zilla Parishad office bearers and members reached the Zilla Parishad by traveling by ST bus. esakal

Dhule News : जि.प. पदाधिकारी, सदस्य लालपरीत; ‘महिला सन्मान’ योजनेच्या स्वागतासाठी बसमधून प्रवास

धुळे : महाराष्ट्र शासनाच्या ‘महिला सन्मान’ योजनेच्या (Mahila Samman scheme) स्वागतासाठी जिल्हा परिषदेतील भाजप पदाधिकारी, सदस्य अर्थसंकल्पीय सभेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करत जिल्हा परिषदेत पोचले. (District office bearers traveled by bus to welcome Mahila Samman scheme dhule news)

महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केलेल्या घोषणेनुसार महिला सन्मान योजनेंतर्गत राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवासभाड्यात महिलांना ५० टक्के सवलत लागू करण्यात आली आहे. १७ मार्चपासून योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या सूचनेनुसार या योजनेचे भाजपकडून स्वागत करण्यात येत आहे.

२४ मार्चला धुळे जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा झाली. सभेला जाताना जिल्हा परिषदेतील पदाधिकारी, सदस्यांनी एसटी बसमधून प्रवास करून योजनेचे स्वागत करावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा अश्‍विनी पाटील, महिला व बालकल्याण सभापती संजीवनी सिसोदे यांनी केले. त्यानुसार जिल्हा परिषदेतील भाजपच्या महिला सदस्यांसह पुरुष सदस्यही एसटी बसने प्रवास करत जिल्हा परिषदेत पोचले.

सर्व पुरुष सदस्यांनी बसमधील महिला सदस्यांसह सर्वच महिला प्रवाशांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. योजनेच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. या निर्णयामुळे महिला सबलीकरणाला मदत होईल, पर्यटन अनुभवाने महिला समृद्ध होतील, परिवहन महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होईल, असे प्रा. अरविंद जाधव म्हणाले. सभापती श्रीमती सिसोदे यांनी सर्व प्रवाशांचे आभार व्यक्त केले.

हेही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

To welcome Mahila Samman Yojana, BJP Zilla Parishad office bearers and members reached the Zilla Parishad by traveling by ST bus.
Dhule News : मार्केटचे आरक्षण; महासभेत 4 हजार चौमी जागेचा उद्या होणार फैसला...

जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा कुसुम निकम, माजी शिक्षण सभापती मंगला भामरे, महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती धरती देवरे, जिल्हा परिषद सदस्या ज्योती बोरसे, सत्यभामा मंगळे, सोनी कदम, अभिलाषा पाटील, बेबी पावरा, सखूबाई पारधी, मोगरा पाडवी, जताबाई पावरा, आरती पावरा, अनिता पावरा, भैरवी शिरसाट, सुमित्रा गांगुर्डे, वैशाली चौधरी, शोभा होळकर, पंचायत समिती सभापती वंदना ईशी, लताबाई पावरा, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील,

शिक्षण सभापती महावीरसिंह रावळ, कृषी सभापती हर्षवर्धन दहिते, समाजकल्याण सभापती कैलास पावरा, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तुषार रंधे, सदस्य वीरेंद्रसिंह गिरासे, संग्राम पाटील, श्री. जाधव, कामराज निकम, देवीदास बोरसे, धनंजय मंगळे, पंकज कदम, ज्ञानेश्वर चौधरी आदींनी बसमधून प्रवास केला. परिवहन महामंडळ धुळेचे आगर व्यवस्थापक वासुदेव देवराज यांनी आभार मानले.

To welcome Mahila Samman Yojana, BJP Zilla Parishad office bearers and members reached the Zilla Parishad by traveling by ST bus.
Dhule Crime News : प्लॅस्टिक कचऱ्याआडून गुटखा तस्करी; धुळे एलसीबीची कारवाई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com