Dhule Crime News : सनी साळवे खून प्रकरणी चौघा जणांना दुहेरी जन्मठेप

शहरातील प्रशांत ऊर्फ सनी प्रकाश साळवे (वय १६) खून प्रकरणातील आठ संशयितांपैकी चार आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली तर एका आरोपीला साडेतीन वर्षांचा कारावास सुनावली.
Dignitaries welcoming the verdict outside the district court in Sunny Salve murder case. Along with Special Public Prosecutor Shyamkant Patil, Adv. Vishal Salve.
Dignitaries welcoming the verdict outside the district court in Sunny Salve murder case. Along with Special Public Prosecutor Shyamkant Patil, Adv. Vishal Salve.esakal
Updated on

Dhule Crime News : शहरातील प्रशांत ऊर्फ सनी प्रकाश साळवे (वय १६) खून प्रकरणातील आठ संशयितांपैकी चार आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली तर एका आरोपीला साडेतीन वर्षांचा कारावास सुनावली.

तसेच अन्य तिघांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. जिल्हा न्यायालय क्रमांक पाचचे न्यायाधीश डी. एम. आहेर यांनी गुरुवारी (ता. २१) हा निकाल दिला. या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते.(Double life imprisonment for four persons in Sunny Salve murder case dhule crime news)

सनी साळवे (रा. चंदननगर, धुळे) व त्याचा मित्र सुमेध सूर्यवंशी यांच्यावर १८ एप्रिल २०१८ ला देवपूरमधील एका हॉटेलजवळ खुनी हल्ला झाला होता. दुचाकीचा कट लागला म्हणून त्यांच्यावर संशयित जितू फुलपगारे याच्यासह साथीदारांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला होता. यात हल्लेखोरांनी सनी साळवे याला चाकू, गुप्तीने भोसकल्याने त्याचा मृत्यू झाला होता.

तसेच त्याचा मित्र व भाऊ गंभीर जखमी झाले होता. या घटनेनंतर देवपूर पोलिस ठाण्यात मारेकरी जितू फुलपगारे, दीपक फुलपगारे, मयूर ऊर्फ गुड्ड्या फुलपगारे, वैभव गवळे, दादा फुलपगारे, गोपाल चौधरी, भय्या बाविस्कर, सनी सानप यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता.

चौघांना जन्मठेप

सनी साळवे खून खटल्याचे कामकाज जिल्हा सत्र न्यायालयात चालले. न्यायालयात सर्व साक्षी, महत्त्वाचे पुरावे तपासण्यात आले. यात तत्कालीन पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. तसेच फिर्यादी सागर साळवे, प्रत्यक्ष साक्षीदार सुमेध सूर्यवंशी, सौरभ साळवे यांच्या साक्षी दिशादर्शक ठरल्या.

Dignitaries welcoming the verdict outside the district court in Sunny Salve murder case. Along with Special Public Prosecutor Shyamkant Patil, Adv. Vishal Salve.
Dhule Crime News : शिरपूर-हाडाखेडजवळ मद्यसाठा जप्त; महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी कारवाई

न्यायालयाने मुख्य आरोपी जितू फुलपगारे, दीपक फुलपगारे, मयूर ऊर्फ गुड्ड्या फुलपगारे, वैभव गवळे यांना दोषी ठरवत त्यांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शिवाय दहा हजारांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास आणखी एक वर्षाच्या शिक्षेची तरतूद केली.

‘दादा’ला कारावास

आरोपी दादा फुलपगारे याला खून व खुनाचा प्रयत्नातून निर्दोष ठरविण्यात आले. मात्र, त्याला इतर कलमांन्वये शिक्षा सुनावण्यात आली. त्यामुळे त्याला साडेतीन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच दहा हजारांचा दंड व दंड न भरल्यास आणखी तीन महिन्यांची शिक्षा देण्यात आली.

या खटल्यात संशयित गोपाल चौधरी, भय्या बाविस्कर आणि सनी सानप यांची न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील म्हणून श्‍यामकांत पाटील यांनी कामकाज पाहिले. त्यांना अ‍ॅड. सी. डी. सोनार, अ‍ॅड. नीलेश दुसाणे, अ‍ॅड. विशाल साळवे, अ‍ॅड. उमाकांत घोडराज यांचे विशेष सहकार्य लाभले.

Dignitaries welcoming the verdict outside the district court in Sunny Salve murder case. Along with Special Public Prosecutor Shyamkant Patil, Adv. Vishal Salve.
Dhule Crime News : दोंडाईचा जिल्हा बँकेत 31 लाखाचा अपहार; शासकीय अनुदानाची परस्पर विल्हेवाट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com