Dhule News : धुळ्यात मद्य प्राशनासह वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई सुरू

Dhule: Vehicles seized by police during investigation
Dhule: Vehicles seized by police during investigationesakal

धुळे : नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलिस शहर वाहतूक नियंत्रण शाखेने तपासणी मोहीम सुरू केली आहे. यात मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या सहा दुचाकीस्वारांवर कारवाई केली. त्यांची वाहने जप्त करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.

अपघाताचे प्रमाण कमी व्हावे, अमली पदार्थांचे (दारुचे) सेवन करून वाहन चालविणाऱ्यांना आळा बसावा यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. नववर्षाच्या स्वागतानिमित्त अनेक जण दारूचे सेवन करत वाहन चालवितात. (Drive Vehicle with alcohol in dhule Action taken against drivers Dhule news)

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

Dhule: Vehicles seized by police during investigation
Nashik crime News : त्यांना तत्काळ अटक करा, अन्यथा...; मयत शिंदेच्या पत्नीचा पोलीस अधीक्षकांना इशारा

त्यामुळे अपघात होऊन गंभीर दुखापती, जीवितहानी किंवा मालमत्तेचेही नुकसान होते. ते रोखण्यासाठी कारवाईचा आदेश देण्यात आला आहे. याअनुषंगाने सहाय्यक पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी ह्रषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेने बुधवारी रात्री शहरात अचानक तपासणी मोहीम सुरू केली.

यात दारूचे सेवन करून वाहन चालविणाऱ्या सहा वाहनधारकांवर कारवाई झाली. त्यात मधुकर देवरे, महेंद्र भामरे, रवींद्र पाटील, कौतिक जाधव, श्रीरंग दिंडे, अभिजित बोरनारे यांच्यावर कारवाई झाली. पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, श्री. रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक धीरज महाजन व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली असून ती सुरूच राहणार नाही. कुणीही दारुचे सेवन करून वाहन चालवू नये, असे आवाहन आहे.

Dhule: Vehicles seized by police during investigation
Nashik News : उंटवाडीजवळ मद्यधुंद कारचालकाची 3 वाहनांना धडक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com