चिमठाणे- खरीप हंगाम २०२३ मध्ये राज्यातील ४० तालुक्यातील दुष्काळी तालुक्यात शिंदखेडा तालुक्याचा समावेश होता. शासनाने दुष्काळी अनुदानासाठी सुमारे ८६ कोटी मतदतीपोटी शिंदखेडा तालुक्याला दुष्काळी अनुदान देण्यात आले आहे. एकूण ६७ हजार ४९२ शेतकऱ्यांपैकी ६१ हजार ९७८ शेतकऱ्यांनी मदतीचा लाभ घेतला असून, पाच हजार ५१४ शेतकरी दोन वर्षांपासून मदतीपासून वंचित आहे. त्यात तीन हजार १७९ शेतकऱ्यांची केवायसी झाली नसल्याने ते मदतीपासून वंचित आहेत.