नशेचे द्रावण पाजून चौघांकडून  युवतीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न 

नशेचे द्रावण पाजून चौघांकडून  युवतीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न 

जळगाव ः जोधपूर-चेन्नई एक्‍स्प्रेसमध्ये सतरावर्षीय युवतीला नशेचे द्रावण पाजून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्याचा मंगळवारी प्रकार उघडकीस आला आहे. याच रेल्वेतून छायाचित्रकार योगेश चौधरींचे आई-वडील विकलांग भावाला घेऊन जळगावला येत असल्याने त्यांनी या चौघांना हटकले. तसेच इतर सहप्रवाशांनीही विरोध केला. त्यानंतर मोबाईलवरून तक्रार करीत असल्याचे पाहून चारही भामटे नंदुरबार स्थानकात धावत्या रेल्वेतून पसार झाले. अर्धशुद्ध अवस्थेतील युवतीला जळगाव लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेत बालनिरीक्षणगृहात रवाना केले. 

नागपूर येथील मूळ रहिवासी असलेली युवती नागपूर येथून गुजरातला पोहोचली. तेथून रेल्वे बदलून ती एकटीच घराकडे जाण्याच्या प्रयत्नात असताना जोधपूर-चेन्नई (2266381 डाऊन) एक्‍प्रेसमध्ये बसली. इंजिनपासून तिसरा डबा महिलांसाठी राखीव आणि दुसरा डबा विकलांग प्रवाशांचा होता. महिला डब्यात गर्दी असल्याने ती विकलांगांच्या डब्यात चढली. यात गर्दी नसल्याने तिच्या मागोमाग चार भामटेही तेथे चढले. त्यांनी तिला खायला दिले त्यात तिची शुद्ध हरपली. अशा अवस्थेत चारही भामटे तिच्याशी डब्यातच अश्‍लील चाळे करीत असल्याचे शंकर चौधरी यांना दिसले. त्यांनी तत्काळ मुलगा योगेशला जळगावात फोन लावून घटना कळविली. त्याने लोहमार्ग पोलिसांना कळविल्यानंतर जळगाव रेल्वेस्थानकात सहाय्यक फौजदार सिद्धार्थ इंगळे, अजय बर्वे, योगेश चौधरी, स्वप्नील महाले यांचे पथक फलाटावर हजर झाले. त्यांनी विकलांगांच्या डब्यातून अर्धशुद्धीत असलेल्या युवतीला सोबत घेत चौकीत आणले. चौकशी केल्यावर तिने आरती ऊर्फ रोशनी संजय गौंड (रा. नागपूर) असे नाव सांगितले असून, तिच्या कुटुंबीयांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. 

मुलगी निरीक्षणगृहात रवाना 
रेल्वे पोलिसांनी तत्काळ संबंधित युवतीला निरीक्षणगृहातील तज्ज्ञांशी संपर्क करून वैद्यकीय उपचारानंतर निरीक्षणगृहात ठेवले जाणार असून, तिच्या पालकांचा शोध घेतल्यावर त्यांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. 

प्रवाशांमुळे वाचला एक गुन्हा 
धावत्या रेल्वेच्या विकलांग डब्यात सहसा प्रवासी कमी असतात. चेन्नई एक्‍स्प्रेसमध्ये तुरळक प्रवासी आणि एकट्या युवतीला गाठून तिला चौघा भामट्यांनी नशेचे द्रावण प्यायला दिले. त्यात ती अर्धशुद्धीत असताना तिच्याशी अश्‍लील चाळे करीत असतानाच शंकर चौधरी, ओंकार रघुनाथ कांबळे यांनी हटकल्याने व तत्काळ मोबाईवरून मदत मागितल्याने भामट्यांनी रेल्वेतून पळ काढला. सहप्रवाशांच्या समयसूचकतेमुळे ही युवती सुखरूप बचावली असून, अनर्थ घडण्यापूर्वीच तिची सुटका झाली. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com