Dhule News : वातावरणात बदलाने शेतकऱ्यांची तारांबळ; शेतकऱ्यांचा पीक काढणीला वेग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Harvesting machine while harvesting wheat crop.

Dhule News : वातावरणात बदलाने शेतकऱ्यांची तारांबळ; शेतकऱ्यांचा पीक काढणीला वेग

नेर (जि. धुळे) : धुळे तालुक्यातील वातावरणातील बदलांमुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली असून काही ठिकाणी शेती पिकांचे (Crop) मोठे नुकसान झाले आहे. (Due to change in climate farmers of Ner areas are struggling to harvest their crops dhule news)

वातावरणात बदल घडल्यामुळे नेर परिसरातील शेतकऱ्यांची पीक काढण्यासाठी तारांबळ उडत आहे. या चिंताग्रस्त जीवन जगणाऱ्या शेतकऱ्यांच्या माथी संकटाचा प्रश्न पाहून 'हे सूर्यनारायणा नेतनेमाने उगवा, अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा. या ना.धो. महानोरांच्या ‘पानझड’ कवितासंग्रहातील ओळी आठवतात.

रोजनिशी वातावरणात दुपारी तीनपासून प्रचंड गारठा, अंधार निर्माण होतो. निसर्गाचे रौद्ररूप पाहून शेतकरी चिंताग्रस्त होतो. तालुक्यातील काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा तोंडी आलेला घास निसर्गाच्या बदलामुळे हिरावून जाण्याची चिंता येथील शेतकऱ्यांना आहे.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

सलग पाच दिवसांपासून वातावरणात होणाऱ्या बदलामुळे नेर येथील शेतकऱ्यांची कांदा, गहू, हरभरा पीक काढणीला वेग दिला आहे. दमदार पाऊस तसेच गारपिटीमुळे होणाऱ्या नुकसानींपासून कसा बचाव होईल. यासाठी येथील शेतकरी काढणी यंत्र, मजूर शोधण्यात व्यस्त असल्याचे चित्र आहे.