नांद्रा ता. पाचोरा - जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जळगाव जिल्ह्यातील ग्राम दक्षता समितीतील सदस्यांची मागील महिन्यात मिटिंग घेऊन वाळूची अवैध वाहतूक पूर्णपणे बंद कशी करता येईल यावर चर्चा केली होती..त्यानुसार सुज्ञ ग्रामस्थांनी तहसीलच्या पथकाला दिलेल्या माहितीवरुन पथकाने पाचोरा शहरातील पुनगाव रस्त्यावर वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई करण्यात आली. दरम्यान, अशा कारवाया सुरुच राहणार असल्याचे तहसीलच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वी वाळूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या गुंडांची थेट महसूलच्या पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर जीवघेणे हल्ले करण्यापर्यंत मजल गेली होती. त्यामुळे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गावागावातील सरपंच, पोलिस पाटील, कोतवाल, ग्रामसभा अधिकारी, ग्रामसेवक अशा सर्वांना आवाहन करुन आपल्या गावातील अवैध धंदे बंद करण्यासाठी आपणही पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले होते. .त्यानुसार, सुरवातीच्या काळात ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पाचोरा तालुक्यातही वाळूची सर्रास अवैध वाहतूक होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्याला आळा घालण्यासाठी पाचोरा उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी भूषण अहिरे यांच्या आदेशाने भडगाव व पाचोरा तालुक्यातील अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली..पाचोरा येथील तहसीलदार विजय बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाला वाळूची अवैधरित्या वाहतूक सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, बुधवारी (ता. २६) रात्री साडेअकराच्या सुमारास पथकाने पाचोरा शहरातील पुनगाव रस्त्यावर थांबून वाळूची अवैधरित्या वाहतूक करणारे डंपर पकडून पाचोरा तहसील कार्यालयात जमा केले. ही कारवाई पाचोऱ्याचे मंडळाधिकारी आर. डी. पाटील, लासगावचे ग्राम महसूल अधिकारी दीपक दवंगे, ललित पाटील, शिवाजी डोंगरे, लहू कोळेकर यांच्या पथकाने केली. या कारवाईचे ग्रामस्थांमधून कौतुक होत असून कारवायांमध्ये प्रशासनाने सातत्य ठेवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.