
पालकांच्या खिशावर ‘महागाई’चा बोजा; शैक्षणिक साहित्य महागले
धुळे : एकीकडे विद्यार्थ्यांच्या पाठीवरच्या दप्तराचे (School Bag) ओझे कमी करण्याची मागणी व कार्यवाही होत असताना दुसरीकडे मात्र यावर्षी आपल्या पाल्यांसाठी शैक्षणिक साहित्य (Educational Materials) खरेदी करताना पालकांवर महागाईचे (Inflation) ओझे पडणार आहे. शैक्षणिक साहित्याच्या दरात यंदा तुलनेने १५ ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने विशेषतः सर्वसामान्य आर्थिक परिस्थिती असलेल्या पालकांचे आर्थिक गणित बिघडणार आहे. (educational materials 15 to 25 percent more expensive due to Inflation Dhule News)
कोरोनाच्या संकटामुळे २०२०-२१ व २०२१-२२ असे दोन शैक्षणिक वर्ष शाळा, महाविद्यालये बंद होती. आता १३ जूनपासून मात्र नियमित शाळा सुरू होणार आहेत. आपली मुले ऑनलाइन शिक्षणाच्या जाळ्यातून निघून शाळेत जातील याचा पालकांना आनंद आहे. मात्र, महागाईने संसाराची गाडी डळमळीत केलेली असताना मुलांच्या महाग झालेल्या शैक्षणिक साहित्य खरेदीचा बोजाही पालकांना सहन करावा लागणार आहे.
हेही वाचा: आरक्षण सोडतीवर 4 हरकती
गेल्या वर्षी शंभर पेजेसच्या वह्यांचे दर प्रतिडझन २०० ते २२० रुपये होते. ते यावर्षी ३०० रुपये, २०० पेजेस वह्यांचे दर प्रतिडझन साडेतीनशेवरून ४०० रुपयांपर्यंत गेले आहेत. मागील वर्षी दहा नग पेनसाठी खरेदीसाठी ३५ रुपये लागत होते. यंदा यात दहा रुपयांची वाढ झाली आहे. याशिवाय स्कूलबॅग, वॉटर बॉटल, बूट, गणवेश व इतर साहित्याचे दर किमान २५ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. कोरोनाच्या संकटामुळे अनेकांचे रोजगार हिरावले गेले. अनेकजण पूर्वीपेक्षा कमी मोबदल्यात काम करत आहेत. त्यात महागाईमुळे घर चालविताना कसरत करावी लागत असतानाच यात मुलांच्या शैक्षणिक खर्चाचाही पालकांवर बोजा पडणार आहे. महागाईमुळे शैक्षणिक साहित्य खरेदीसाठीही पालकांना जागा पैसे मोजावे लागणार आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत सरासरी दोन ते अडीच हजार रुपयांचा अधिक भार पेलावा लागणार आहे.
हेही वाचा: 25 मिनिटात दुचाकी केली लंपास
कागद, वाहतूक खर्चात वाढ
गेल्या वर्षी शैक्षणिक साहित्यावरील जीएसटी १२ टक्क्यांवरून १६ टक्के करण्यात आला आहे. त्यात कागदाच्या दरांसह वाहतूक खर्च वाढला आहे. सोबतच मजुरी, हमाली व इतर खर्च वाढल्याने शैक्षणिक साहित्याचे दर वाढले आहेत. वह्यांचे दर १५ ते २० टक्के, पेन दोन ते चार रुपये आणि स्कूल बॅगचे दर २० टक्क्यांनी वाढले असल्याचे शालेय साहित्य विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
Web Title: Educational Materials 15 To 25 Percent More Expensive Due To Inflation Dhule News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..