जामनेर- काही वर्षांपूर्वी एकनाथ खडसे यांच्यावरही प्रफुल्ल लोढा याने त्यांच्या मुलाच्या मृत्यूबाबत गंभीर आरोप केले होते. त्या वेळी तो त्यांच्याबाबत अतिशय खालच्या भाषेत काय काय बरळला होता, याबद्दल मला काहीही बोलायचे नाही. नाथाभाऊंनी आतातरी बालिशपणाचे आरोप करू नयेत, असे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.