esakal | नाथाभाऊंनी 'महाजनां'ना केले आत्महत्येपासून परावृत्त
sakal

बोलून बातमी शोधा

eknath khadse

भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांना तिकीट न मिळाल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत.

नाथाभाऊंनी 'महाजनां'ना केले आत्महत्येपासून परावृत्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांना तिकीट न मिळाल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. एका कार्यकर्त्याने तर रॉकेल ओतून घेऊन आत्महत्या करणार असल्याचे फोनवरून सांगितले. मात्र, खडसे यांनी त्यांना आत्महत्येपासून परावृत्त केले.

मुक्ताईनगरात त्यांच्या समर्थक व कार्यकर्त्यांनी मेळावा घेऊन खडसे यांना अपक्ष म्हणून उभं राहण्याची गळ घातली. कार्यकर्त्यांची भाषणं सुरू असतानाच नाना महाजन हे कार्यकर्ते आत्महत्या करण्याच्या विचारात असल्याची बातमी मेळाव्यात पसरली. याबाबतची माहिती खडसेंना देण्यात आली. काही वेळातच नाना महाजन यांचा फोन खडसेंना जोडून देण्यात आला. यावेळी खडसेंनी त्यांची समजूत काढली. आपण संघाचे स्वयंसेवक आहोत. पक्षाची शिस्त पाळली पाहिजे. वरिष्ठांनी काही विचार करूनच निर्णय घेतला असेल, असे खडसे म्हणाले. यानंतर तो कार्यकर्ता शांत झाला.

नाना महाजन खडसेंना फोन करून म्हणाले, 'नाथाभाऊ, तुम्हाला तिकिट मिळत नाही. हे काही बरोबर नाही. मी रॉकेल ओतून घेणार.' मात्र, खडसे यांनी त्याची समजून काढली आणि पक्ष-संघटनेचा आदेश पाळण्याच्या शिस्तीची आठवण करून दिली. दरम्यान, महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची उमेदवारांची तिसरी यादी प्रसिद्ध झाली. मात्र, त्या यादीमध्येही खडसेंचे नाव नाही.