Video : अहिराणी लोकगीतांमधून मनोरंजनासह प्रचाराची धूम

 जगन्नाथ पाटील : सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

प्रचारातून खेडोपाडी रंगत वाढली आहे. मनोरंजनासह प्रचाराचा हा फंडा सगळ्यांच्या पसंतीस उतरत आहे.भारुड, टिंगरीवाले आणि अहिराणी पारंपारीक गीतांमधून प्रचार करणारे हिंदी, मराठी आणि अहिराणी गीतांचा वापर करीत आहेत. त्यांनी या गीतांचे बोल आणि चाल प्रचाराच्या गाण्यांमध्ये परावर्तित केली आहे. 

धुळे : जिल्ह्यात प्रचाराचे रणशिंग आता शिगेला पोहचत चालले आहे. प्रचार प्रभावी व्हावा. उमेदवार, त्यांचे चिन्हे, त्यांचे काम आणि योजना लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी आता भारूड, टिंगरीवाले, कव्वालीवाले, वासुदेव आदीं कलाकारांचा खुबीने वापर होत आहे. यांच्या प्रचारातून खेडोपाडी रंगत वाढली आहे. मनोरंजनासह प्रचाराचा हा फंडा सगळ्यांच्या पसंतीस उतरत आहे. भारुड, टिंगरीवाले आणि अहिराणी पारंपारीक गीतांमधून प्रचार करणारे हिंदी, मराठी आणि अहिराणी गीतांचा वापर करीत आहेत. त्यांनी या गीतांचे बोल आणि चाल प्रचाराच्या गाण्यांमध्ये परावर्तित केली आहे. 

कला सादर करण्याची संधी - कलाकार
सध्या वाक्काड बबल्या, बबल्या इकस केसावर फुगे आदी गाण्यांचे प्रचार गाण्यांमध्ये रुपांतर केले आहे. ही प्रचारगीते सर्वच पक्षांनी वापरली आहेत.
 गावगाड्यातील अहिराणी कलावंतांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत. त्यांना किती मानधन मिळते. यापेक्षा कला सादर करण्याची संधी मिळत असल्याचे समाधान आहे, असे टिंगरीवाले कलाकार संजय सावंत यांनी सांगितले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: elections promotions from ahirani songs