प्रशांत पाटील : तांदलवाडी (ता. रावेर)- सृष्टीची निरागस आनंदनिर्मिती म्हणजे चिमणी. निश्चिंत मनाने पडवीत गिरक्या मारणारी. गॅलरीत घरटे करणारी. तुमचे अंगण चिवचिवाटाने भरणारी. इटुकला आकार, पिटुकला संसार. वळचणीला घर, नितकोर जेवण. वितभर आयुष्य. उगाच हव्यास नाही, भलत्यासलत्या अपेक्षा नाहीत. अध्यात नाही मध्यात नाही. सगळ्यांशी दोस्ती लहानगी बाळं ''एक घास चिऊचा'' घेतच वाढणार.