जळगाव- जिल्ह्यातील तापमान दिवसेंदिवस वाढत असून, ४४ ते ४६ अंशादरम्यान तापमान पोचले आहे. त्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. अति तापमानामुळे विहिरींच्या जलपातळीत घट होत आहे. दुसरीकडे पाणीटंचाई निर्माण होऊन टँकरची मागणी वाढत आहे. जिल्ह्यात आता सहा गावांत सात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.