Nandurbar Employment Fair : 28 डिसेंबरला रोजगार मेळावा

२८ डिसेंबर रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त विजय रिसे यांनी दिली.
job fair
job fairesakal
Updated on

Nandurbar Employment Fair : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व जिजामाता शिक्षण संस्था, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने २८ डिसेंबर रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त विजय रिसे यांनी दिली.

सेंट मदर तेरेसा इंग्लिश मीडियम स्कूल जिजामाता महाविद्यालय शेजारी, नंदुरबार येथे सकाळी दहाला मेळाव्यास प्रारंभ होणार आहे. (Employment fair on 28 December in nandurbar news)

मेळाव्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर यापूर्वी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपला नोंदणी क्रमांक व पासवर्ड वापरून नोंदणीतील सर्व माहिती अद्ययावत करावी.

नोंदणी न केलेल्यांनी शिक्षण, अनुभव इत्यादी सर्व अद्ययावत माहिती भरून नोंदणी करावी. नोंदणी झाल्यानंतर आपल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर उमेदवारास नोंदणी क्रमांक व पासवर्ड प्राप्त होईल.

job fair
Dhule Employment Fair : धुळ्यात 3081 रिक्त पदांसाठी मुलाखती; या संकेतस्थळावर करा नोंदणी

तो वापरून पोर्टलवर लॉगिन करावे, त्यानंतर आपल्या नोंदणीच्या माहितीतील पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉबफेअर मधील दिसणाऱ्या रोजगार मेळाव्याच्या यादीतील नंदुरबार जिल्हा निवडून त्यातील रोजगाराची माहिती पाहावी व रिक्तपदांची माहिती पाहून नोंदणी करावी.

त्यानंतरच ऑनलाइन रोजगार मेळाव्यातील आपला सहभाग पूर्ण होईल. याबाबत काही मदत आणि माहितीसाठी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. या मेळाव्याचा इच्छुक उद्योजक आणि बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही सहाय्यक आयुक्त श्री. रिसे यांनी केले आहे.

job fair
Nandurbar Employment Fair : पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे उद्या आयोजन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com