Dhule News : अतिक्रमणधारकांनी स्वतःहून हटविली अतिक्रमणे

A team of Public Works Department during encroachment clearance operation in front of Civil Hospital on Sakri Road.
A team of Public Works Department during encroachment clearance operation in front of Civil Hospital on Sakri Road.esakal
Updated on

Dhule News : शहरातील मुख्य रस्त्यांवरच्या अतिक्रमण निर्मूलनाला सुरवात झाल्यानंतर या कारवाईला आता विरोध न करता अतिक्रमणधारक आपापली अतिक्रमणे काढून घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

मंगळवारी (ता. २) कारवाईच्या चौथ्या दिवशी शहरातील साक्री रोडवरील ८० टक्के अतिक्रमणे संबंधितांनी स्वतःहून काढून घेतल्याने पथकाला जास्त परिश्रम घ्यावे लागले नाहीत.(encroachments were removed by encroachers themselves dhule news )

सार्वजनिक बांधकाम विभाग, धुळे महापालिका यांच्यातर्फे व पोलिसांच्या मदतीने शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्याची मोहीम चार दिवसांपासून सुरू आहे. पहिल्या व दुसऱ्या दिवशी देवपूर भागात व बारापत्थर भागात कारवाई करण्यात आली. बुधवारी (ता. १) शहरातील आग्रा रोड, स्वस्तिक चौक व परिसरात कारवाई झाली.

या कारवाईदरम्यान पथकांनी पायऱ्या, ओटे, शेड, गटारावरील अतिक्रमणे जेसीबीने काढली. इतर टपऱ्या उचलून घेतल्या. या कारवाईदरम्यान काही ठिकाणी विरोध झाला, थोडाबहुत वादही झाला. मात्र विरोध झुगारत पथकांनी कारवाई केली.

या कारवाईमुळे विशेषतः फेरीवाल्यांनी आपापले बस्तान इतरत्र हलविल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, गुरुवारी (ता. २) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पथकाने साक्री रोड भागात कारवाई केली.

स्वतःहून अतिक्रमणे हटविली

शहरातील गुरुशिष्य स्मारक ते हॉटेल कृष्णाई, हनुमान टेकडीदरम्यान अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईत पथकाने काही ठिकाणी गटारावर केलेली अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने तोडून टाकली, काही ठिकाणच्या सात-आठ टपऱ्याही क्रेनच्या सहाय्याने उचलून जप्त केल्या.

A team of Public Works Department during encroachment clearance operation in front of Civil Hospital on Sakri Road.
Dhule News : राज्य शासनाच्या निर्णयाविरुद्ध शेतकऱ्यांत असंतोष; दुष्काळ सत्ताधाऱ्यांच्या तालुक्यात जाहीर!

मात्र, मोठ्या प्रमाणावर या रस्त्यावरील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी व दुकानदारांनी आपापल्या दुकानांसमोरील शेड व इतर अतिक्रमणे स्वतःहून काढून घेण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे पथकाला फारसे परिश्रम घ्यावे लागले नसल्याचे चित्र पाहायला मिळाले.

साक्री रोडवरील साधारण ८० टक्के अतिक्रमणे संबंधितांनी स्वतःहून हटवून घेतल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पथकाचे विभागीय अभियंते धर्मेंद्र झाल्टे यांनी सांगितले. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर अतिक्रमणधारक विरोध न करता अतिक्रमणे काढत असल्याचे चित्र आहे.

सकाळपासूनच लगबग

गुरुवारी (ता. २) साक्री रोडवर कारवाई होणार हे माहीत असल्याने सकाळपासूनच अनेक जणांनी आपापल्या टपऱ्या हटवून घेण्यास, पत्र्याची शेड असलेल्यांनी ते काढून घेण्यास सुरवात केली होती. भाजीपाला विक्रेतेही लवकरात लवकर माल विक्री करून निघण्याच्या तयारीत पाहायला मिळाले. दरम्यान, आता पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची काळजी यंत्रणेला घ्यावी लागणार आहे.

A team of Public Works Department during encroachment clearance operation in front of Civil Hospital on Sakri Road.
Dhule Crime News : सराईत दुचाकीचोर जेरबंद; कारवाईत 5 दुचाकी जप्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.