Erandol News : खड्ड्यामुळे एरंडोलच्या रस्त्यावर वाहतूक विस्कळीत, प्रशासनाला जाग येणार का?
Poor Road Safety Measures Raise Concerns in Erandol’s Dharangaon Chowk : उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या वळणावरील रस्त्यावर खोदलेल्या जीवघेण्या खड्ड्यात ट्रकचे चाक अडकल्याने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, या रस्त्यावरील जीवघेणा खड्डा त्वरित बुजविण्याची मागणी नागरिक अनेक दिवसांपासून करीत आहेत.
एरंडोल- येथील धरणगाव चौफुलीजवळील उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या वळणावरील रस्त्यावर खोदलेल्या जीवघेण्या खड्ड्यात शनिवारी (ता. २१) सकाळी सातच्या सुमारास ट्रकचे चाक अडकल्याने मोठी दुर्घटना टळली.