Dhule Highway News : जनतेनेदेखील विषय लावून धरण्याची आवश्यकता; लोकप्रतिनिधी, प्रशासनाने लक्ष देण्याची गरज

Errors in four lane national highway number 6 need to be addressed by public representatives administration dhule news
Errors in four lane national highway number 6 need to be addressed by public representatives administration dhule newsesakal

Dhule Highway News : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणातील त्रुटी व यातून भविष्यात अपघातास निमंत्रण ठरू शकणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालून त्या आताच सोडवून घेण्याची गरज आहे,

अन्यथा त्याकडे दुर्लक्ष झाल्यास अनेकांना यात आपला जीव गमवावा लागू शकतो. यासाठी प्रामुख्याने खासदार डॉ. हीना गावित, आमदार मंजुळा गावित, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांनी अधिक लक्ष घालण्याची गरज आहे (Errors in four lane national highway number 6 need to be addressed by public representatives administration dhule news)

राष्ट्रीय महामार्ग सहाचे चौपदरीकरण करत असताना अनेक ठिकाणी त्रुटी आढळून येत आहेत. त्यात प्रामुख्याने अत्यंत वर्दळीचे ठिकाण असलेल्या शेवाळी फाटा येथे चार रस्ते एकत्र येत असतानादेखील गरजेचे असणारे अंडर पास, उड्डाणपूल न करता केवळ वाहतूक बेट तयार केले आहे. याशिवाय कावठे फाट्याजवळदेखील याच पद्धतीने नव्या रस्त्यावरून जुन्या रस्त्यावर येण्यासाठी कुठलीही व्यवस्था नाही.

शहरातून जाणाऱ्या जुन्या महामार्गाचा दुरुस्तीचा, चौपदरीकरणाचा तसेच सुशोभीकरणाच्या विषयावर सुस्पष्टता नाही. अशा वेळी या सर्व अडचणी तीन दिवसांपासून ‘दुखणं महामार्गाचं’ या वृत्तमालिकेतून अधोरेखित करण्यात येत असताना या वृत्तमालिकेचे जनसामान्यांमधून मोठे स्वागत झाले. या अडचणींची आताच सोडवणूक झाली पाहिजे, अशीदेखील अपेक्षा जनसामान्यांमधून व्यक्त होत आहे.

लोकप्रतिनिधी, प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज

सर्वसामान्यांच्या तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मागणीकडे प्रशासन विशेषता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण फारसे गांभीर्याने लक्ष देत नसेल तर लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून सोडवणूक करून घेण्याची गरज आहे. तसेच जनसामान्यांच्या या विषयातील तीव्र भावनांची दखल घेऊन वेळीच या प्रश्नांकडे गांभीर्यने लक्ष घालण्याची गरज आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Errors in four lane national highway number 6 need to be addressed by public representatives administration dhule news
Dhule News : उद्योजकांना जीएसटीसह व्याजाचा भुर्दंड; अन्यायाविरोधात लढा उभारण्याचा लघुउद्योगभारतीचा इशारा

विशेषता खासदार डॉ. हीना गावित, आमदार मंजुळा गावित यांच्याकडून लोकांना हे प्रश्न सोडविण्याची अपेक्षा असून, त्यांनी यात गांभीर्याने लक्ष दिल्यास निश्चित मार्ग निघू शकणार आहे. तसेच जिल्हाधिकारी, पोलिस प्रशासन, महामार्ग पोलिस या सर्वांनीदेखील भविष्यात निर्माण होणाऱ्या अडचणींचा विचार करून आजच याची सोडवणूक करून घेतल्यास या अडचणींमुळे भविष्यात होणाऱ्या अपघातातून जाणारे अनेकांचे प्राण वाचविण्यास मदत होणार आहे.

एकीकडे लोकप्रतिनिधी, प्रशासनाकडून या अडचणींच्या सोडवणुकीची अपेक्षा व्यक्त केली जात असताना या प्रश्नांची सोडवणूक न झाल्यास जनतेनेदेखील हा विषय लावून धरण्याची आवश्यकता आहे. यासाठी प्रसंगी संविधानिक पद्धतीने आपल्या मागण्या मांडून सामुदायिक प्रयत्न केल्यास निश्चितच याच्यातून मार्ग निघू शकेल.

निवेदनांना केराची टोपली

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणात अनेक वेळा अडचणी उद्‌भवत असताना रस्त्यालगतच्या गावातील नागरिकांनी, विविध पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी प्रशासनास निवेदन दिले, मात्र यात कुठलीही सुधारणा दिसून आली नाही. यातून या निवेदनांना केराची टोपली दाखविली जाते की काय, असा प्रश्न निर्माण होतो.

Errors in four lane national highway number 6 need to be addressed by public representatives administration dhule news
Dhule Highway News : नव्या महामार्गाने जुन्या रस्त्याला यायचं कसं? कावठे फाट्यावर तारांबळ; अपघातांतही वाढ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com