घरकुल गैरव्यवहार : सुरेश जैन यांना 7 तर देवकरांना 5 वर्षांचा कारावास

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

न्या. सृष्टी नीळकंठ यांनी आज दुपारी सव्वा वाजता हा निकाल देत सर्वांना ताब्यात घेण्याचे आदेश स्थानिक पोलिसांना दिले.

धुळे : राज्यभरात गाजलेल्या तत्कालीन पालिकेच्या घरकुल घोटाळ्यात माजीमंत्री सुरेशदादा जैन, गुलाबराव देवकरांना जिल्हा विशेष न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. सुरेश जैन यांना 100 कोटींचा दंड आणि 7 वर्षांची शिक्षा, तर गुलाबराव देवकर यांना 5 लाख रुपये दंड आणि 5 वर्षांची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. 

जैन आणि देवकर यांच्यासह इतर सर्व 48 आरोपींना धुळ्याच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरविले आहे. न्या. सृष्टी नीळकंठ यांनी आज दुपारी सव्वा वाजता हा निकाल देत सर्वांना ताब्यात घेण्याचे आदेश स्थानिक पोलिसांना दिले. त्यानुसार पोलिसांनीही सर्वांना ताब्यात घेण्याची कारवाई सुरु केली आहे.

प्रदीप रायसोनींना 5 वर्षे कैद आणि 10 लाख रुपयांचा दंड, राजेंद्र मयूर 5 वर्षे कैद आणि 40 कोटी रुपये दंड, जगन्नाथ वाणी यांना 7 वर्षे कैद आणि 40 कोटी रुपये यांनाही न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. 

जळगाव पालिकेच्या राज्यभर गाजलेल्या घरकुल घोटाळ्याचा निकाल आज धुळ्याच्या विशेष न्यायालयात लागणार होता. त्यादृष्टीने स्थानिक पोलिस प्रशासनाने आवश्‍यक बंदोबस्त सकाळपासूनच तैनात केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ex Maha ministers Suresh Jain and Gulabrao Deokar convicted in housing scam