JEE Mains Result : एसव्हीकेएम सीबीएसईचा फहाद अन्सारी जिल्ह्यात टॉपर

एसव्हीकेएम सीबीएसई स्कूलचा फहाद अन्सारी ९९.४१ पर्सेंटाइल गुण मिळवत जेईई मेन्समध्ये जिल्ह्यात टॉपर ठरला.
Sanjay Agarwal, Sunanda Menon felicitating the successful students Fahad Ansari, Rishabh Khadse of SVKM CBSE School.
Sanjay Agarwal, Sunanda Menon felicitating the successful students Fahad Ansari, Rishabh Khadse of SVKM CBSE School.esakal

धुळे : येथील एसव्हीकेएम सीबीएसई स्कूलचा फहाद अन्सारी ९९.४१ पर्सेंटाइल गुण मिळवत जेईई मेन्समध्ये जिल्ह्यात टॉपर ठरला. ऋषभ खडसे यास ९८.७४ पर्सेंटाइल गुण मिळाले.

एसव्हीकेएम सीबीएसई स्कूलचा बारावीचा विद्यार्थी फहाद अन्सारी याने जेईई मेन्समध्ये ९९.४१ पर्सेंटाइल गुण तसेच भौतिकशास्त्र १०० पर्सेंटाइल, रसायनशास्त्र ९९.८ पर्सेंटाइल गुण मिळवत जिल्ह्यात टॉपर रँक मिळविली. (Fahad Ansari of SVKM CBSE School emerged dhule district topper in JEE Mains by securing 99.41 percentile marks news)

Sanjay Agarwal, Sunanda Menon felicitating the successful students Fahad Ansari, Rishabh Khadse of SVKM CBSE School.
Dhule News : आता सर्वच जिल्ह्यात हिमोफिलिया डे-केअर सेंटर; रुग्णांच्या आयुर्मानात वाढ

ऋषभ खडसे याने ९८.७४ पर्सेंटाइल गुण तसेच भौतिकशास्त्र ९८.७४ पर्सेंटाइल, गणितात ९८.९ पर्सेंटाइल गुण मिळवत घवघवीत यश प्राप्त केले. दोन्ही विद्यार्थी जेईई ॲडव्हान्ससाठी पात्र ठरले आहेत.

फहाद अन्सारी व ऋषभ खडसे यांनी जेईई मेन परीक्षेत यश मिळविल्याने त्यांचा एसव्हीकेएम धुळे कॅम्पसचे इन्चार्ज संजय अग्रवाल व प्राचार्य सुनंदा मेनन यांनी पालकांसह सत्कार केला.

या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल एसव्हीकेएम संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, संस्थेचे सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष चिंतनभाई पटेल, व्यवस्थापन समिती सदस्य राजगोपाल भंडारी, धुळे कॅम्पसचे इन्चार्ज संजय अग्रवाल, शाळेच्या संचालिका गिरिजा मोहन, प्राचार्य सुनंदा मेनन आणि शिक्षकांनी कौतुक केले.

Sanjay Agarwal, Sunanda Menon felicitating the successful students Fahad Ansari, Rishabh Khadse of SVKM CBSE School.
JEE Mains Result: जेईई मेन्‍समध्ये आयुषची बाजी! नाशिकच्‍या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com