ही परिषद करणार प्रबोधनात्मक उपक्रमातून शेतकरी आत्महत्या निर्मूलन 

निखिल सूर्यवंशी
Friday, 8 November 2019

धुळे ः राज्यातील शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय पद्‌धतीने पीक, कीड व्यवस्थापनाबाबत जागर करतानाच या घटकाच्या आत्महत्या निर्मूलनाबाबत महाराष्ट्र राज्य संत गाडगे महाराज प्रबोधन परिषद सरसावली असल्याची माहिती धुळेस्थित या परिषदेच्या उपाध्यक्षा प्रा. वैशाली पाटील यांनी दिली. परिषदेतर्फे शेतकरी, महिला व विविध घटकांचे समुपदेशन करतानाच विविध प्रबोधनात्मक उपक्रम राबविले जाणार आहेत. 

धुळे ः राज्यातील शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय पद्‌धतीने पीक, कीड व्यवस्थापनाबाबत जागर करतानाच या घटकाच्या आत्महत्या निर्मूलनाबाबत महाराष्ट्र राज्य संत गाडगे महाराज प्रबोधन परिषद सरसावली असल्याची माहिती धुळेस्थित या परिषदेच्या उपाध्यक्षा प्रा. वैशाली पाटील यांनी दिली. परिषदेतर्फे शेतकरी, महिला व विविध घटकांचे समुपदेशन करतानाच विविध प्रबोधनात्मक उपक्रम राबविले जाणार आहेत. 

संत गाडगे महाराज प्रबोधन परिषद आणि राहुरीस्थित महात्मा फुले कृषी विद्यापीठातील सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यालयातर्फे या विद्यापीठात राज्यव्यापी मेळावा झाला. मुख्याध्यापिका धनवटे, शिक्षक शिवथरे प्रमुख पाहुणे होते. कीटकशास्त्र तज्ज्ञ डॉ. जे. आर. कदम, अपर सचिव उमेश चांदिवडे, सर्वोच्च न्यायालयातील ऍड. आशिष गायकवाड, नाशिकचे पोलिस उपअधीक्षक गजानन शेलार, गडचिरोली येथील सतीश होडगर, बाबासाहेब भिंगारदे, डॉ. रवींद्र निमसे, अभियंता कांचन शिसोदे, डॉ. स्नेहल जाधव, डॉ. सपना कल्याणकर, अश्विनी पाटील, सरला गांगुर्डे, शुभांगी पाटील, संगीता रास्ते, मंजूषा राऊत, सिद्धार्थ साळवे, योगिता भिटे, मनीषा शिरसाट, दीपाली तागडे, चंदा सोनवणे, डॉ. शीतल मोगल, उमेश खाचणे, अनिता वाघमारे, डॉ. वैभव कुटे, अशोक आव्हाड आदी उपस्थित होते. 
उपाध्यक्षा प्रा. पाटील यांनी समुपदेशन ही काळाची गरज बनली असून परिषदेतर्फे शेतकरी आत्महत्या निर्मूलन, विविध विषयांवर शेतकऱ्यांचे प्रबोधन व मार्गदर्शन केले जाईल, असे सांगितले. डॉ. कदम यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करणे आणि परिषदेतर्फे राज्यव्यापी प्रबोधन करताना सेंद्रिय पद्‌धतीने पीक, कीड व्यवस्थापनावर भर दिला जाईल, असे स्पष्ट केले. डॉ. जाधव, डॉ. कल्याणकर यांनी महिलांच्या आरोग्याविषयी प्रबोधन केले जाणार असल्याचे नमूद केले. ऍड. गायकवाड, श्री. शेलार, श्री. होडगर यांनी महिलांच्या आत्मनिर्भरतेची गरज व्यक्त करत त्यांनी कायदाविषयक साक्षर व्हावे, असे आवाहन केले. उपस्थित मान्यवरांनी परिषदेच्या उपक्रमांना सहकार्याची ग्वाही दिली. श्री. चांदिवडे, श्री. भिंगारदे, डॉ. निमसे, श्री. साळवे आणि उपाध्यक्षा प्रा. पाटील यांनी संयोजन केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer sucide stop gadge maharaj prabodhan parishad programe dhule