अमळनेर- तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील नुकसानीबाबत पीकविम्याचा तब्बल आठ महिन्यांपासून लाभ मिळालेला नाही. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी लोकशाहीदिनी जळगावला जाऊन थेट जिल्हाधिकाऱ्यांकडेच आपली कैफियत मांडली. १५ एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविम्याचा लाभ मिळाला नाही तर कोणत्याही क्षणी प्रांताधिकारी कार्यालयासमोर पूर्वसूचना न देता शेतकरी आत्महत्या प्रात्यक्षिक फाशी आंदोलन करतील, असा गंभीर इशारा शेतकऱ्यांनी दिला.