धुळे : मुस्लिम समाजाचा पहिला आमदार निवडल्याने शक्तीप्रदर्शनासह विजयी मिरवणूक

धुळे : मुस्लिम समाजाचा पहिला आमदार निवडल्याने शक्तीप्रदर्शनासह विजयी मिरवणूक
Updated on

धुळे : विधानसभा निवडणुकीतील धुळे मतदारसंघात प्रस्थापित मातब्बर उमेदवारांना झटका देत 'एमआयएम'ने विजय मिळविला. यात उमेदवार डॉ. फारुक शहा यांनी मुस्लीम समाजाचे पहिले आमदार होण्याचा बहुमान मिळविला आहे. या निकालाचे आनंदित मुस्लिम समाजातील तरुणांसह आबालवृद्धांनी स्वागत केले. या पार्श्‍वभूमीवर शक्तीप्रदर्शन करत डॉ. शहा यांच्यासह समर्थकांनी विजयी मिरवणूक काढली.

आमदार डॉ. फारुक शाह यांनी तीन हजार मताधिक्‍याने विजय मिळविला. त्यांनी अपक्ष उमेदवार माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी आमदार अनिल गोटे, महायुतीचे उमेदवार हिलाल माळी यांचा पराभव केला. निकालाविषयी सर्व तर्कवितर्क, अनुमान धुळीस मिळवत ऑल इंडिया मजलिस- ए - इत्तेहदुल मुस्लीमीन अर्थात "एमआयएम'ची उमेदवारी करणारे डॉ. शाह यांनी विजयातून सर्वांना धक्का दिला.

डॉ. शहा यांचा प्रवास

सर्वप्रथम काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते राहिलेले आमदार डॉ. शहा हे माजी आमदार अनिल गोटे यांच्या लोकसंग्राम संघटनेतर्फे नगरसेवक, नंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे उपमहापौर झाले, असे असताना त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी "एमआयएम'तर्फे पहिल्यांदा नशीब अजमावले. त्यात ते विजयी झाले.

निकालानंतर आनंदित हजारो मुस्लीम समाजाच्या नागरिकांसह तरुणांनी मिरवणुका काढण्यास सुरवात केली. आमदार डॉ. शाह यांची त्यांच्या ऐंशीफुटी रोडवरील बाबानगरमधील निवासस्थानापासून शुक्रवारी दुपारी दोननंतर विजयी मिरवणूक निघाली. ती रात्री सायंकाळी उशिरापर्यंत चालली. त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.

हैदराबाद येथील "एमआयएम'चे पदाधिकारी सहभागी झाले. उमेदवारी अर्जाची प्रक्रिया सुरू असताना या संघटनेचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांची मुस्लीमबहुल भागात सभा झाली होती. तेव्हापासून निर्माण झालेल्या ओवेसी यांच्या सुप्त लाटेने डॉ. शाह यांच्या गळ्यात आमदारकीची माळ टाकली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com