
धुळे : शहरात दिवाळीची धामधूम शिगेला आहे. एकीकडे पारंपरिक पद्धतीने घरासमोर, अंगणात दिव्यांची आरास लावून घरासह परिसर दिव्यांच्या मंद प्रकाशाने प्रसन्न होत असतानाच अनेक ठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजीचा अतिरेकदेखील पाहायला मिळत आहे.
या अतिरेकीपणामुळे प्रदूषणमुक्त दिवाळीच्या प्रयत्नांवर पाणी फिरत असल्याचे पाहायला मिळते. रविवारी (ता. १२) रात्री धुळे शहरातही विविध भागांत उशिरापर्यंत फटाके फोडले गेले.
या फटाक्यांचा कचरा उचलण्यासाठी, रस्ते-चौक स्वच्छ करण्यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना स्वच्छता मोहीम हाती घ्यावी लागली. (firecrackers Cleanliness campaign in city by Municipal Corporation Dhule News)
गेल्या काही दिवसांत देशातील दिल्ली, मुंबईसह इतर मोठ्या शहरांमध्ये प्रदूषणाची समस्या गंभीर बनली आहे. या गंभीर परिस्थितीमुळे थेट न्यायालयाला केंद्र, राज्य सरकारांना काही दिशानिर्देश देण्याची वेळ आली. प्रदूषण वाढण्यास अनेक कारणे आहेत.
त्यातच दीपावली सण असल्याने फटाक्यांची आतषबाजी स्वाभाविकपणे होत आहे. मात्र, फटाके फोडण्याचा काही ठिकाणी अतिरेक पाहायला मिळत आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून पारंपरिक पद्धतीने दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
घरोघरी मन प्रसन्न करणारे दिवे लागले. फटाकेही फुटले. मात्र, फटाक्यांचा हा आवाज दिवाळी सणाला साजेसा होता. रविवारी (ता. १३) मात्र रात्री उशिरापर्यंत फटाक्यांच्या माळा फुटत राहिल्या. शहराच्या विविध भागांत फटाके फोडण्याचा अतिरेक झाल्यागत चित्र पाहायला मिळाले.
शासनासह विविध सामाजिक संस्था, संघटनांकडून प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संदेश दिला गेला. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरा करण्याचा संकल्पही केला. यातून पर्यावरणरक्षणाचा संदेश दिला गेला.
या उपक्रमांतून अनेक जणांनी फटाकेमुक्त दिवाळी किंवा किमान अतिरेक होणार नाही अशा पद्धतीने दिवाळी साजरी केली, करत आहेत. काही ठिकाणी मात्र प्रदूषणमुक्त दिवाळीच्या या प्रयत्नांवर पाणी फेरल्याचे चित्रही पाहायला मिळाले.
मनपाकडून स्वच्छता मोहीम
स्वच्छ दिवाळी-शुभ दिवाळी अभियानांतर्गत महापालिकेकडून सोमवारी सकाळी शहराच्या विविध भागांत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत विविध रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर फटाक्यांचा कचरा उचलून रस्ते, चौक साफ करण्यात आले.
ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात फटाके फोडल्याने कचरा जमा झाला, अशा भागात ही मोहीम राबविण्यात आली. आग्रा रोड, पेठ भाग, पाचकंदील, जेबी रोड, महात्मा गांधी पुतळा चौक, दत्तमंदिर, अग्रवालनगर यासह इतर काही भागांत ही मोहीम राबविण्यात आली.
मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे, स्वच्छता निरीक्षक चंद्रकांत जाधव, विकास साळवे, मुकादम कैलास पाटील, अनिल जावडेक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.