नवापूर पंचायत समितीच्या इमारतीसाठी पाच कोटी मंजूर

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 January 2020

नवापुर येथील पंचायत समितीच्या नवीन व अद्ययावत इमारतीच्या उभारणीसाठी चार कोटी 91 लाख रुपयांच्या प्रस्तावास आमदार शिरीषकुमार नाईक यांनी शासनाकडून प्रशासकीय मंजुरी मिळवली आहे.

नवापूर : येथील पंचायत समितीच्या नवीन व अद्ययावत इमारतीच्या उभारणीसाठी चार कोटी ९१ लाख रुपयांच्या प्रस्तावास आमदार शिरीषकुमार नाईक यांनी शासनाकडून प्रशासकीय मंजुरी मिळवली आहे.

येथील पंचायत समितीची स्थापना झाल्यानंतर उभारण्यात आलेली कौलारू इमारत आजही उपयोगात आणली जात आहे. मुख्य इमारतीच्या आवारात जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व विभागांच्या इमारती गरजेनुसार वेगवेगळ्या ठिकाणी उभारण्यात आल्या आहेत. पंचायत समिती व जिल्हा परिषद अंतर्गत येणारे सर्व विभाग एकाच छताखाली यावेत असा आमदार नाईक यांचा मानस होता. त्या अनुषंगाने नवीन इमारतीच्या उभारणीसाठी बांधकाम विभागास प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार चार कोटी 91 लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव तयार केला. त्याला आमदार नाईक यांनी शासनाकडून प्रशासकीय मंजुरी मिळवली आहे. बांधकाम विभागाची दुमजली नवीन इमारत सोडून पंचायत समितीची कौलारू इमारत व इतर सर्व इमारती पाडण्यात येणार आहे. लवकरच यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे व इमारतीच्या उभारणीचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती आमदार नाईक यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five crore sanctioned for building of Navapur Panchayat Samiti