Crime News : रावेर पोलिसांची कामगिरी: मध्य प्रदेश, ओडिसा, राजस्थानमधून अपहरण झालेल्या ५ अल्पवयीन मुलींची सुटका!
Raver Police Successful Operation to Rescue Minors : रावेर पोलिसांनी विविध राज्यांतून अपहरण झालेल्या पाच अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन त्यांची सुखरूप सुटका केली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल रावेर पोलीस पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रावेर: तालुक्यातील विविध गावांमधून अपहरण केलेल्या पाच अल्पवयीन मुलींची विविध राज्यांतून सुटका करून रावेर पोलिसांनी त्यांना त्यांच्या आईवडिलांकडे स्वाधिन केले.