पावसानंतर दाटले हे रेशमी धुके! पाहा...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

नाशिक : मंगळवारी झालेल्या पावसानंतर वातावरणात बदल झाला.  बुधवारी पहाटे पासून चांमरलेणी पायथा व परिसरात धुकं पसरले, धुक्यातून दिसणारे हे नयनरम्य दृश्य सर्वांनीच अनुभवले. (छाया : सोमनाथ कोकरे)

(छाया : सोमनाथ कोकरे)

नाशिक : मंगळवारी झालेल्या पावसानंतर वातावरणात बदल झाला.  बुधवारी पहाटे पासून चांमरलेणी पायथा व परिसरात धुकं पसरले, धुक्यातून दिसणारे हे नयनरम्य दृश्य सर्वांनीच अनुभवले.जिल्ह्यात आजपासून (ता. २५) पाच दिवस मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार गुरुवारी (ता. २६) ५३, शुक्रवारी (ता. २७) ४४, तर शनिवारी (ता. २८) १३ व रविवारी (ता. २९) २७ मिलीमीटर पावसाची शक्‍यता आहे. या कालावधीत कमाल तापमान ३० ते ३३ व किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअसपर्यंत, तर वाऱ्याचा वेग तासाला ३ ते ६ किलोमीटर राहण्याची शक्‍यता या विभागाची आहे. हवामानातील बदलामुळे धुळीचे साम्राज्य वाढलेले असताना आरोग्याचे प्रश्‍न तयार झाले होते. पावसाने वातावरणाला कलाटणी मिळाल्याने या प्रश्‍नांवर काही अंशी उपाय होईल. 

मंगळवारी सायंकाळी शहर, परिसरात पावसाची जोरदार हजेरी 
मागील चोवीस तासात मालेगावमध्ये 13, नांदगावमध्ये 5, चांदवडमध्ये 33, कळवणमध्ये 87, बागलाणमध्ये 37, सुरगाण्यात 1.2, देवळ्यात 22, निफाडमध्ये 3.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी 1 जून ते 24 सप्टेंबर या कालावधीत 86.5 टक्के पाऊस जिल्ह्यात झाला होता. यंदा आतापर्यंत 148.27 टक्के पाऊस झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fog after rain at mountain in nashik