
कंपनीचा माध्यमातून संबधिताने व्यवहार दाखवून शासनाचा १४ कोटी ७१ लाखाचा जी.एस.टी.रक्कमेचा घोटाळा केला.
नंदुरबार ः खांडबारा (ता. नवापूर) येथील एकाचा पॅन कार्डचा वापर करून खोटे दस्ताऐवज तयार करून टेक्स्टाईल कंपनीची स्थापना करीत तिच्या नावे १४ कोटी ७१ लाख रूपयाचा जी.एस.टी. रक्कमेचा घोटाळा केल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान याबाबत मात्र संबंधित व्यक्तीस कानोसाही लागलेला नाही. जी.एस.टी विभागाकडून संबधितास अटक केली गेली. त्यावेळी या प्रकरणाचा उलगडा झाला.
आवश्य वाचा- स्मशानभूमीचे रुपडे पालटून खडतर 2020 या वर्षाला या गावाने दिला निरोप
याबाबत घटनेची माहिती अशी, खांडबारा (ता. नवापूर) येथील सतीश रावजी पाडवी यांच्या नावाने ऑक्टोबर २०२० पूर्वी केव्हा तरी त्यांचा पॅन कार्डचा उपयोग करून अज्ञात व्यक्तीने कुमकुम टेक्सटाईल्स य नावाची कंपनीची स्थापना केली. त्या कंपनीचा माध्यमातून संबधिताने व्यवहार दाखवून शासनाचा १४ कोटी ७१ लाखाचा जी.एस.टी.रक्कमेचा घोटाळा केला. ही बाबत जी.एस.टी. विभागाच्या लक्षात आल्यावर त्यांचा पथकाने थेट खांडबारा गाठून सतीश रावजी पाडवी यांना ताब्यात घेतले. त्यानंतर सतीश पाडवी यांना प्रकरण काय आहे हे कळले. तोपर्यंत त्यांना सुगावाही नव्हता.
आर्वजून वाचा- लॉकडाउनच्या फटक्यात उद्योगांची फरफट; अनेकांचा कायमचा रोजगार गेला
खोटी कागदपत्रे तयार केले
आपल्या दस्ताऐवजचा गैरवापर करून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने एवढा मोठा घोटाळा केल्याचे त्यांना कळल्यावर त्यांनी फसवणूक व आपली बदनामी झाली म्हणून सतीश पाडवी यांनी विसरवाडी पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे